धरण उशाला……आणि कोरड घशाला. – बेलेवाडी ग्रामस्थांना नियमित पाणीपुरवठा करा. – अन्यथा आंदोलनाचा पवित्रा. – भाजपचे निवेदन.
आजरा. – प्रतिनिधी.
आजरा तालुक्यातील बेलेवाडी गावाला नियमित पाणी पुरवठा व्हावा अशी मागणी होत आहे. “धरण उशाला……आणि कोरड घशाला”
आसा काहीसा प्रकार बेलेवाडी गावात चालू असून गावाच्या बाजूने चिकोत्रा नदी बारमाही वाहत असून तसेच सामान्य नागरिकांना पाणी पट्टी नियमित भरून सुद्धा ग्रामपंचायतीच्या भोंगळ व अनागोंदी कारभारा मुळे बेलेवाडीच्या ग्रामस्थांना एक दिवस आड पाणी पुरवठा होत आहे.
सदर पाणी पुरवठा नियमित व्हावा या साठी भारतीय जनता पार्टी बेले वाडी मार्फत ग्रामपंचायतीला निवेदन देण्यात आले , येत्या आठ दिवसात पाणी पुरवठा नियमित नाही झाल्यास गावातील महिलांचा घागर मोर्चा ग्रामपंचायतीवर इशारा या निवेदनातुन देण्यात आला आहे. या निवेदनावर भाजपचे ग्रामपंचायत सदस्य महादेव रामाने, मीनाक्षी सुतार भाजप शाखा अध्यक्ष जोतिबा नांदवडेकर, तसेच संतोष शिंत्रे, संजय बिल्ले, दत्तात्रय कुंभार सह ग्रामस्थ यांच्या सह्या आहेत.