पोलिसांच्या बदल्यांचा शिंदे-फडणवीस सरकारने मांडला खेळ.- असा सवाल विचारला जात आहे.
मुंबई. – प्रतिनिधी.

शिंदे-फडणवीस सरकारने पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा अक्षरशः खेळ मांडलाय. मंगळवारी दुपारी महासंचालक कार्यालयातून नऊ अधीक्षकांच्या बदलीला स्थगिती आदेश जारी केल्यानंतर रात्री उशिरा गृह विभागाने त्या अधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्तीचे आदेश काढले.या भोंगळ कारभारामुळे गोंधळलेल्या शिंदे-फडणवीस सरकारचे नेमके चाललंय तरी काय, असा सवाल विचारला जात आहे.
गृह विभागाने सोमवारी सायंकाळी अधीक्षक दर्जाच्या 104 अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले. सोमवारची रात्र उलटत नाही तोच महासंचालक कार्यालयातून मंगळवारी दुपारी एक आदेश जारी करून त्यापैकी नऊ अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती देण्यात आली. त्यानंतर रात्री उशिरा गृह विभागाने त्या नऊ अधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्तीचे आदेश जारी केले. राज्यकर्त्यांमध्ये जकमत नसल्याने अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा खेळ सुरू असल्याचे पोलीस वर्तुळात बोलले जात आहे. गेल्या महिन्यातही अशाच प्रकारे सकाळ, दुपार, संध्याकाळ असे बदल्या मग स्थगिती, पुन्हा नवी नियुक्ती असे आदेश काढण्यात आले होते.
मंगळवारी रात्री उशिरा गृह विभागाने काढलेल्या नव्या आदेशानुसार नम्रता पाटील – रा. रा. पो. बल (पुणे), दीपक देवराज – राज्य आर्थिक गुन्हे शाखा, सुनील लोखंडे – एसीबी (ठाणे), तिरुपती काकडे – नवी मुंबई, प्रकाश गायकवाड – मीरा-भाईंदर-वसई-विरार, श्वेता खेडकर – नागपूर शहर. याव्यतिरिक्त संदीप डोईपह्डे यांची पर्ह्स-1 तर धोंडोपंत एस. स्वामी यांची मुंबई परिमंडळ-8 येथून करण्यात आलेली बदली रद्द करण्यात आली आहे. तसेच प्रशांत मोहिते, योगेश चव्हाण यांच्या नव्या नियुक्तीचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहेत. किशोर काळे यांची अपर पोलीस अधीक्षक-धुळे या पदावर नियुक्ती केल्याचे गृह विभागाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.