भारत जोडो यात्रेसाठी आजरा – गडहिंग्लज – चंदगड मधून हजारो कार्यकर्ते हिंगोली कडे रवाना.
कोल्हापूर. – प्रतिनिधी.
काँग्रेस नेते राहूल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेची सुरुवात ७ सप्टेंबरला कन्याकुमारी येथून झाली होती. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा १६ नोव्हेंबर रोजी वाशिम जिल्ह्यातून अकोला जिल्ह्यात दाखल होत आहे. मात्र, राहुल गांधी वाशिममधून अकोला जिल्ह्यात प्रवेश करताना मेडशी ते पातुरदरम्यानचा १६ किलोमीटरचा यात्रेचा प्रवास कारने होणार आहे. मेडशी ते पातूरदरम्यान जंगलाचा परिसर लक्षात घेता सुरक्षा यंत्रणांनी त्यांना कारमधून प्रवास करण्याची विनंती केली. दरम्यान, राहुल गांधीं यांना सीआरपीएफची झेड प्लस सुरक्षा आहे.

येणाऱ्या १२ रोजी राहुल गांधी यांचा पद्ययात्रा दौरा हिंगोली येथे येणार असून या भारत जोडो यात्रेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक शहरातून हजारो काँग्रेसचे कार्यकर्ते रवाना होत आहेत कोल्हापूर येथून माजी मंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसेच आजरा गडहिंग्लज चंदगड तालुक्यातील गडहिंग्लज मधून गोकुळ संचालिका श्रीमंती अंजनाताई रेडेकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते हिंगोली कडे रवाना झाले आहेत. तसेच आजरा मधून जि प सदस्य उमेश आपटे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्ते काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते भारत जोडो यात्रेसाठी सज्ज झाले आहेत.