१ डिसेंबरला गोड साखर ची चिमणी पेटवणार. – आम. राजेश पाटील.
( चालू कारखाना बंद पाडणाऱ्या नतभ्रष्ट लोकांना गावच्या वेशीत घेऊ नका. )
गडहिंग्लज. – प्रतिनिधी.

चालू कारखाना बंद पाडणाऱ्या नतभ्रष्ट लोकांना गावच्या वेशीत घेऊ नका. कारण या लोकांनी फक्त कारखाना बंद पडला नाही तर 16 लोकांना सोबत घेऊन दुसऱ्याच्या चुलीत पाणी ओतण्याचे काम केले आहे काळभैरव कामगार आघाडीच्या वतीने १ डिसेंबरला गोड साखरची चिमणी पेटवणार आम. राजेश पाटील यांनी इंचनाळ येथील प्रचार सभेत बोलत होते. अध्यक्षस्थानी इंचनाळचे यशवंत देसाई होते. पुढे बोलताना आम. श्री. पाटील म्हणाले आजरा साखर कारखान्यांना हसन मुश्रीफ यांनी मदत केली मग गडहिंग्लज कारखान्याला मदत का केली नाही एकास एक अशी वागणूक का दिली कोणाच्या सोबत जावे हे तुम्हाला समजलं नाही कस , खोटी स्वप्न दाखवून दिशाभूल करणारे यांनी डेक्कन ऍग्रो बंद पाडला प्रथम डेक्कन ऍग्रो चालू करा मग कारखाना चालू करूया आम्ही खालच्या पातळीवर जाऊन आरोप करत नाही तुमच्यासोबत फिरणाऱ्या व सुपारी घेऊन बोलणाऱ्या नेत्यांना लोकांनी आमच्यावर आरोप करताना मतदारांनी माफी मागायला लावली इतक्या खालच्या पातळीवर आम्ही जाणार नाही कारण ते आमच्यावर संस्कार नाहीत. असे कडगाव – कौलगे मतदार संघातील इंचनाळ येथे बोलताना आम. पाटील म्हणाले. यावेळी माजी आम. श्रीपतराव शिंदे म्हणाले कारखाना बंद पाडणारी टोळी आपल्याला खोटी स्वप्न दाखवून प्रचार करत आहेत चिखलातून बाहेर कारखाना काढतो म्हणणारे तेरा वर्षे सोबत असताना कारखाना बंद पडण्याचे पाप कोणी केले हे आम्हाला चांगलं माहिती आहे बारा लोकांचे कान कोणी भरवले व चालू कारखाना ज्यांनी बंद पडला हे पाप तुम्ही कुठे फेडणार दाभेवाडी येथील पाणीपुरवठा योजना येथील शेतकऱ्यांच्या जमिनी लिलावात निघाल्या तर याला जबाबदार डॉ. शहापूरकर आहेत. माजी आम. शिंदे म्हणाले यावेळी अमर चव्हाण, श्री कुराडेसर यांची भाषणे झाली. यावेळी प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. माजी उपाध्यक्ष संग्रामसिंह नलवडे यांनी आभार व मनोगत व्यक्त केले.