गोडसाखरच्या काळभैरी पॅनलला आजऱ्यातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा जाहीर.- नेते शिंपी व चराटी गटाने केले जाहीर.
गडहिंग्लज. – प्रतिनिधी.
गडहिंग्लजच्या आप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखाना पंचवार्षीक निवडणुक चुरशीने होत आहे. प्रचारामध्ये दोन्ही पॅनेलचे नेते एक मेकावर आरोपांच्या फैरी सोशल मिडीयाच्या माध्यमातून सुरु आसतानाच आजरा तालुक्यातून जेष्ठ नेते जयंवतराव शिंपी तसेच आण्णा भाऊ समुहाचे नेते भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आशोक चराटी यांनी आज दि. ४ रोजी आजरा तालुक्यातील पुर्व भागातील साखर कारखाना कार्य क्षेत्रात सभासद आसणाऱ्या भादवण -हा भादवणवाडी, पेद्रेवाडी, कोवाडे, निगुडगे, सरोळी, कानोली, गजरगाव, हारूर, कानोली, सुळे लाकुडवाडी, संरबळवाडी या गावातील प्रमुख कार्यकर्त्याच्या बैठकीत श्री काळभैरी शेतकरी कामगार विकास आघाडीला जाहीर पांठिबा दिला. यावेळी नगरसेवक विलास नाईक, अभिषेक शिंपी, तसेच रमेश रेडेकर, कुलकर्णी उपअध्यक्ष एमटी पाटील सुभाष पाटील दशरथ आमृते संभाजी सरदेसाई समीर पारधे अनिल डोंगरे दयानंद पाटील आदी उपस्थित होते.