Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रसीआरपीएफमध्ये पहिल्यांदा दोन महिला अधिकाऱ्यांची महानिरीक्षक म्हणून नियुक्ती.

सीआरपीएफमध्ये पहिल्यांदा दोन महिला अधिकाऱ्यांची महानिरीक्षक म्हणून नियुक्ती.

सीआरपीएफमध्ये पहिल्यांदा दोन महिला अधिकाऱ्यांची महानिरीक्षक म्हणून नियुक्ती.

नवी दिल्ली. – वृत्तसंस्था.

केंद्रीय निमलष्करी दलात उच्च स्तरावर महिलांना समान संधी देण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलत, पहिल्यांदा सीआरपीएफमध्ये दोन महिला अधिकाऱ्यांची महानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.विशेष म्हणजे या दोन्ही महिला अधिकारी सीआरपीएफ केडरच्या असून 35 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर त्यांना ही संधी मिळाली आहे. पॅरा मिलिटरी फोर्समध्ये आतापर्यंत केवळ महिला आयपीएस अधिकारी इतक्या मोठ्या पदावर पोहोचू शकल्या आहेत.

सीआरपीएफच्या म्हणण्यानुसार, हे दोन महानिरीक्षक एनी अब्राहम आणि सीमा धुंडिया आहेत. अ‍ॅनी अब्राहम यांची रॅपिड अॅक्शन फोर्सच्या (RAF) महानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर सीमा धुंडिया यांना सीआरपीएफच्या बिहार सेक्टरचे महानिरीक्षक बनवण्यात आले आहे.

सीआरपीएफमध्ये असिस्टंट कमांडंट म्हणून रुजू झाले

अ‍ॅनी अब्राहम आणि सीमा धुंडिया या दोघी सीआरपीएफमधील महिला अधिकाऱ्यांच्या 1987 पहिल्या तुकडीच्या अधिकारी आहेत आणि त्या सहायक कमांडंट म्हणून रुजू झाल्या होत्या. 1986 मध्ये पहिल्यांदा सीआरपीएफमध्ये महिला बटालियनची स्थापना करण्यात आली. आरएफचे महानिरीक्षक म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी अ‍ॅनी अब्राहम यांनी फोर्स हेडक्वार्टरमध्ये दिल्ली डीआयजी (इंटेलिजन्स) आणि काश्मीरमध्ये डीआयजी (ऑपरेशन्स) म्हणूनही काम केले आहे. त्यांनी यूएन पीसकीपिंग मिशन अंतर्गत लायबेरियातील सर्व महिला पोलीस युनिटच्या प्रभारी म्हणूनही काम केले आहे. सीमा धुंडिया यांची बिहार सेक्टरचे महानिरीक्षक म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी आरएएफचे डीआयजी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

राष्ट्रपती पदकाने करण्यात आलं आहे सन्मानित

सीआरपीएफमच्या दोन्ही महिला महानिरीक्षकांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आलं आहे. विशेष बाब म्हणजे सीआरपीएफम पुढील वर्षी म्हणजेच 2023 च्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये केंद्रीय सशस्त्र पोलीस दल सीआरपीएफ मध्ये महिला सशक्तीकरणाच्या थीमवर काम करत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.