➡️ महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती स्थगित
महाराष्ट्र राज्यात नोव्हेंबर 2022 मध्ये 14 हजार 956 जागांसाठी होणारी पोलीस शिपाई भरती प्रक्रिया तात्पुरती स्थगित केली असल्याचे पत्र पोलिस महासंचालक कार्यालयाने प्रसिद्ध केले आहे. पोलीस शिपाई भरती बाबत कालच जाहिरात प्रसिद्ध केली होती. आज 29 ऑक्टोबर 2022 रोजी याला स्थगिती मिळाल्यामुळे हजारो तरुणांची निराशा झाली आहे.