आजरा बस स्थानकाचे उर्वरित काम कधी करणार. – आजरा शिवसेनेचे. – आगार व्यवस्थापनाला निवेदन.
आजरा. – प्रतिनिधी.
आजरा येथील नव्याने झालेल्या बस स्थानक सुसज्ज व सर्वसोयीनियुक्त व्हावे यासाठी आजरा शिवसेनेच्या वतीने अनेक वर्ष मोर्चे व आंदोलने करण्यात आली होती. याची दखल घेऊन सन २०१४ नंतर शिवसेना व युतीच्या काळात माजी परिवाहन मंत्री दिवाकर रावते यांनी बस स्थानकाला निधी लावला व २०१८ मध्ये या कामाचे भूमिपूजन घेऊन कामाला सुरुवात झाली पण अजूनही या बस स्थानकाचे काम पूर्ण आहे आजरा तालुका हा दुर्गम व डोंगराळ भाग असल्याने व आजरा शहरात शाळा व कॉलेज असल्यामुळे अनेक वाड्या वस्तीवरून ग्रामीण भागातून लोक एसटी बस स्थानक या ठिकाणी येतात व इथून प्रवास करतात घरी चार वर्षे बस स्थानकाचे काम सुरू आहे. जवळ जवळ संपत आले आहे तरीही रोहित काम करण्यास हलगर्जीपणा दिसत आहे. यामुळे बस स्थानकावर घाण दुर्गंधी व स्वच्छता गृहाचे काम यामुळे तालुक्यातील नागरिक महिला व शाळेचे विद्यार्थी यांची कुचुंबना होत आहे जर येणाऱ्या पंधरा दिवसात उरलेले काम पूर्ण करून बस स्थानकाचे लोकार्पण करून लोकांच्या सेवेत दिले नाहीत तर शिवसेनेच्या वतीने या बस स्थानकाचे प्रतीकात्मक उद्घाटन करून आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी अशा आशयाचे निवेदन आजरा आगार व्यवस्थापनाला देण्यात आले आहे. या निवेदनावर जिल्हा उपसंघटक संभाजी पाटील, तालुकाप्रमुख युवराज पोवार, शहर प्रमुख ओमकार माद्याळकर, शिव सहकार सेना अध्यक्ष शंकर संकपाळ, दिनेश कांबळे, महेश पाटील, रोहित शेंडे, संजय कांबळे, शिवाजी आढाव, महादेव होडगे राजकुमार भोगण सह शिवसैनिकांच्या सह्या आहेत.