Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रप्राथमिक शिक्षणाचा अभ्यास पोलिस भरतीसाठी फायद्याचा. - सुनिल हारुगडे,पेरणोलीत युवा भारतच्या वतीने...

प्राथमिक शिक्षणाचा अभ्यास पोलिस भरतीसाठी फायद्याचा. – सुनिल हारुगडे,पेरणोलीत युवा भारतच्या वतीने मार्गदर्शन.

प्राथमिक शिक्षणाचा अभ्यास पोलिस भरतीसाठी फायद्याचा. – सुनिल हारुगडे,पेरणोलीत युवा भारतच्या वतीने मार्गदर्शन.

आजरा :- प्रतिनिधी.

शारीरिक तंदुरुस्तीसह चालू घडामोडींची माहिती,अवांतर वाचन आणि प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमाचा कसून अभ्यास पोलीस भरतीत नियुक्तीसाठी फायद्याचा असल्याचे प्रतिपादन आजरा पोलीस निरीक्षक सुनिल हारूगडे यांनी केले. पेरणोली ता आजरा येथे युवा भारत सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणीक संस्थेच्या वतीने पोलीस भरती मार्गदर्शन कार्यक्रमात ते प्रमूख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. हारुगडे म्हणाले,भरतीसाठी नम्रता, धाडस आवश्यक आहे.विविध विषयांचे प्रत्येकी एकाच पुस्तकाचे वाचन करावे. अभ्यासाचे नियोजन करणे आवश्यक आहे.अभ्यासातून उत्तर काढायचे कौशल्य निर्माण केले पाहिजे.धोका पत्करायची तयारी ठेवावी.मनावर ताण न घेता अभ्यास करावा.वाहून घेतल्याशिवाय यश मिळणार नाही. व्ही आय आएएस अँकँडमीचे प्रमूख विवेक शेळोलीकर म्हणाले,शारिरीक चाचणीत जादा गुण मिळवणे आपल्या हातात असल्याने त्यावर अधिक लक्ष द्यावे.मराठी, गणित व बुद्धिमत्तेचा अभ्यास महत्त्वाचा.स्वतामधील उणिवा शोधायला शिकला तर यश निश्चित मिळू शकते. मोबाईलचा वापर बंद करावा.यावेळी पेरणोली बीट आमलदार चेतन घाटगे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संवादात्मक चर्चेमध्ये संस्थेचे सदस्य संतोष देसाई, विनायक कांबळे, शुभम लोंढे यांनी सहभाग घेतला. याप्रसंगी अध्यक्ष पंकज देसाई,आकाश कांबळे,कृष्णा वांद्रे,पोलीस पाटील दिपाली कांबळे,पार्थ दोरूगडे,शुभम सुतार,स्वप्निल सावंत,रामदास कोडक,संतोष सावंत,मयुरेश देसाई,रोशन सावंत, मेघा येरूडकर, अपूर्वा सावंत यासह मोठ्या संख्येने तरुण, तरूणी उपस्थित होते. सूत्रसंचालन सुनिल कांबळे यांनी केले. प्रास्ताविक कृष्णा सावंत यांनी केले.आभार संतोष देसाई यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.