Homeकोंकण - ठाणेफडणवीस-बावनकुळेंच्या नागपूरमध्ये भाजपला मोठा धक्का; पंचायत समिती सभापती निवडणुकीत सुपडा साफ.

फडणवीस-बावनकुळेंच्या नागपूरमध्ये भाजपला मोठा धक्का; पंचायत समिती सभापती निवडणुकीत सुपडा साफ.

फडणवीस-बावनकुळेंच्या नागपूरमध्ये भाजपला मोठा धक्का; पंचायत समिती सभापती निवडणुकीत सुपडा साफ.

नागपूर. – प्रतिनिधी.

भाजपमधील दिग्गज नेते ज्या नागपूर जिल्ह्यातून येतात त्याच जिल्ह्यात सभापतीपद निवडणुकीत पक्षाची दारूण अवस्था झाल्याने राज्यभर हा चर्चेचा विषय ठरला आहे.
राज्यात सत्तांतर घडवून भाजपने काही महिन्यांपूर्वी महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला. मात्र याच भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूर जिल्ह्यात मात्र काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यांच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपला धोबीपछाड देत काँग्रेसने तब्बल ९ जागांवर विजय मिळवलं आहे. भाजपला मात्र खातंही उघडता आलं नाही.
भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे पालकमंत्रीही आहेत. तसंच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हेदेखील याच नागपूर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतात. राज्य पातळीवरील दोन मोठ्या नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपला पराभवाचा धक्का बसल्याने मोठी चर्चा रंगत आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा विधानसभा मतदारसंघ असलेल्या काटोल आणि नरखेड या तालुक्यांतील सभापतीपद राष्ट्रवादीकडे ठेवण्या यश मिळवलं आहे. तसंच हिंगणा तालुक्यातील सभापतीपद निवडणुकीतही राष्ट्रवादीने बाजी मारली आहे. जिल्ह्यातील एका तालुक्याचं सभापतीपद मिळवण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना हा पक्ष यशस्वी ठरला आहे. या पक्षाचे रामटेक तालुक्यातील आमदार आशिष जैसवाल यांनी तालुक्यातील सभापतीपद आपल्या पक्षाच्या उमेदवाराकडे खेचून आणलं आहे.

दरम्यान, नागपूर जिल्ह्यात भाजपला केवळ २ तालुक्यांमध्ये उपसभापतीपदावर समाधान मानवं लागलं आहे. पक्षातील दिग्गज नेते ज्या नागपूर जिल्ह्यातून येतात त्याच जिल्ह्यात सभापतीपद निवडणुकीत भाजपची दारूण अवस्था झाल्याने राज्यभर हा चर्चेचा विषय ठरला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.