आजऱ्यात शाळा बचाव आंदोलनाचा मंगळवारी मेळावा.- पटसंख्येच्या आतील शाळा बंद करण्याचा घाट – विरोधात आंदोलन उभे करणारा मेळावा.
आजरा :- प्रतिनिधी.
राज्य शासनाने २० पटसंख्येच्या आतील शाळा बंद करण्याचा घाट घातला आहे. या विरोधात जनआंदोलन उभे करण्यासाठी आजरा येथे मंगळवार दि १८ रोजी शाळा बचाव आंदोलनाच्यावतीने पालक व शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांचा मेळावा घेण्याचा निर्णय समन्वय समितीच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी काँ.संपत देसाई म्हणाले,शासन खाजगीकरणाच्या दिशेने जात आहे. शाळा सुद्धा खासगीकरण करण्याचा शासनाचा डाव आहे. वाड्यावस्त्यावरील शाळा बंद केल्या तर विशेषत; शिक्षणापासून मुली वंचित राहणार आहेत. काँ.संजय तर्डेकर म्हणाले प्राथमिक शिक्षण बंद करणे म्हणजे बहुजन कष्टक-यांच्या मुळावर घाव घालत आहेत.हा मनुस्मृतिकडे नेण्याचे धोरण आहे. शिक्षण वाचवण्यासाठी लोकआंदोलनाची गरज निर्माण झालेली आहे.यावेळी शिक्षक बँक संचालक शिवाजी बोलके,कृष्णा सावंत, सुनिल कामत,रविंद्र दोरूगडे,विजय कांबळे यांनी चर्चेत सहभाग घेतला. यावेळी समाजातील बुद्धीजीवी वर्ग,पालक व विविध सामाजिक संघटनांनी यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याप्रसंगी मायकेल फर्नांडीस,आनंदा कुंभार, प्रकाश तिबिले, सत्यवान सोन्ने आदी उपस्थित होते. स्वागत उमाजी कुंभार यांनी केले. प्रास्ताविक समन्वय समिती अध्यक्ष एकनाथ आजगेकर यांनी केले. आभार सुरेश देशमूख यांनी मानले.