साहित्य समाजाला दिशा देण्याचे काम करत. – प्रो. डॉ. अशोक बाचुळकर.
( श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर साहित्य पुरस्कार सोहळा संपन्न. )
आजरा. – प्रतिनिधी.
साहित्य समाजाला दिशा देण्याचे काम करत – तर कादंबरी व कवीच्या माध्यमातून आपल्या जगाची निर्मिती करत असतो म्हणून लेखक हा नव्या जगाचा निर्माता आहे. कारण लेखक हे चारित्र्यसंपन्न असतात आपल्या साहित्यला मिळालेल्या पुरस्काराची उंची वाढवण्याची जबाबदारी आहे. या निकोप राष्ट्राची उभारणी व्हावी. असे आपले काम असावे यासाठी आपल्याला शुभेच्छा यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. असे श्रीमंत गंगामाई वाचन मंदिराचे अध्यक्ष. प्रो. डॉ. अशोक बाचुळकर आजरा येथील श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरच्या साहित्य पुरस्कारांचे वितरण समारंभ प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. स्वागत व प्रस्ताविक श्रीमंत गंगाबाई वाचन मंदिराच्या उपाध्यक्ष गीता पोतदार यांनी केले. पुढे बोलताना. प्रो. श्री बाचुळकर यांनी श्रीमंत गंगामाई वाचन मंदिराचा मागील आढावा व नव्याने हातात घेत असलेले उपक्रम याची माहिती देत पुरस्कर्त्यांचे अभिनंदन वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रमुख पाहुणे साहित्यिक व ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार दळवी बोलताना म्हणाले लेखक हे हळव्या मनाचा असतात प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्षाचे पुस्तक असावे आयुष्यातील पुस्तक कागदावर उठवले पाहिजेत प्रत्येकाने आपले आत्मचरित्र लिहावे इच्छाशक्ती असेल तर जीवनात अशक्य गोष्ट कोणतीही नाही तर आपल्या जीवनातील काही आलेले अनुभव त्यांनी सांगत जीवनात संघर्ष केल्याशिवाय यश प्राप्त होत नसल्याचे यावेळी श्री दळवी यांनी बोलताना म्हणाले. यावेळी लेखक नंदू साळुंखे, विलास मोरे, संजय चौधरी, श्रीकांत नाईक यांनी आपली मनोगत व्यक्त केली या पुरस्कार वितरण समारंभात
मृत्युंजयकार शिवाजी सावंत कादंबरी पुरस्कार नंदू साळोखे यांच्या इपळाप कादंबरीला तर भूमिपुत्र साहित्यिक पुरस्कार प्रा. श्रीकांत नाईक यांना कै.दाजी टोपले नाट्यलेखन पुरस्कार डॉ. अनंता सूर ( चंद्रपूर ) यांच्या प्रतिशोधला नाटकाला, डॉ.बाबासाहेब आंबेडकर लक्षणीय गद्य साहित्य पुरस्कार डॉ. राजेंद्र राऊत ( अमरावती ) यांच्या लीळाचरित्रातील कथनरूपे ललित गद्यकृतीला, बाल कवितासंग्रह पुरस्कार विलास मोरे ( जळगाव ) यांच्या तिसरा डोळा बालसाहित्याला, मैत्र काव्य पुरस्कार संजय चौधरी ( नाशिक ) यांच्या आतल्या विस्तवाच्या कविता या काव्यसंग्रहाला, तर भूमिपुत्र साहित्यिक पुरस्कार प्रा. श्रीकांत नाईक ( गडहिंग्लज) यांना जाहीर झाला आहे. माता गौरव पुरस्कार श्रीमती सुनंदा कातकर ( खेडे, ता. आजरा ), कै. काशिनाथअण्णा चराटी उत्कृष्ट ग्रंथालय अ वर्ग पुरस्कार – सार्वजनिक वाचनालय मलकापूर ता. शाहूवाडी, कै. माधवरावजी देशपांडे उत्कृष्ट ग्रंथालय ब वर्ग पुरस्कार – स्वराज्य ग्रामीण वाचनालय वेंगरूळ ता.भुदरगड, कै. बळीरामजी देसाई उत्कृष्ट ग्रंथालय क वर्ग पुरस्कार – भाऊसो कुराडे सार्वजनिक वाचनालय सरोळी ता. आजरा यांना पुरस्कार देण्यात आले.
तर उत्कृष्ट वाचक म्हणून बालवाचक कु. आयर्न कांबळे, अभ्यासिका पंकज कांबळे, महिला वाचक श्रीमती साधना डोणकर, पुरुष वाचक वसंत जोशी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा जोत्सत्ना चराटी उपनगराध्यक्षा अस्मिता जाधव, श्रीमंत गंगामाई वाचन मंदिराची सर्व संचालक व्यवस्थापक कर्मचारी तसेच आजरा शहरातील वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन कार्यवाह सदाशिव मोरे यांनी केले आभार संभाजी इंजल यांनी मानले.
