Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआजरा साखरचा २४ वा गळीत हंगाम शुभारंभ. - सोमवार. १७ रोजी डॉ....

आजरा साखरचा २४ वा गळीत हंगाम शुभारंभ. – सोमवार. १७ रोजी डॉ. आनंद उर्फ नृसिंह एकनाथ गोसावी महाराज, आम. हसन मुश्रीफ यांचे शुभहस्ते – होणार संपन्न.

आजरा साखरचा २४ वा गळीत हंगाम शुभारंभ. – सोमवार. १७ रोजी डॉ. आनंद उर्फ नृसिंह एकनाथ गोसावी महाराज, आम. हसन मुश्रीफ यांचे शुभहस्ते – होणार संपन्न.

आजरा. – प्रतिनिधी.

आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. गवसे २४ वा. गळीत हंगाम शुभारंभ सोम. दि. १७ रोजी स. ११ वा. डॉ. आनंद उर्फ नृसिंह एकनाथ गोसावी महाराज. पीठाधीश श्री हरीकाका गोसावी ऋग्वेदी भागवत मठ हत्तरगी जि. बेळगाव तसेच माजी मंत्री आम. हसन मुश्रीफ यांचे शुभहस्ते होणार संपन्न होणार आहे. या गळीत हंगाम शुभारंभ खास. संजय मडलिक यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून. या शुभारंभ प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून माजी मंत्री आमदार सतेज पाटील, माजी मंत्री आम. विनय कोरे, आम. राजेश पाटील, आम. प्रकाश आबिटकर, संभाजी पाटील, नागेश चौगुले, राजेंद्र गड्डाण्णवार, सुधीर कुंभार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे तरी या गणित हंगाम शुभारंभासाठी सर्व सभासद बंधू भगिनी ऊस पुरवठावदार शेतकरी ठेविदार सामाजिक व राजकीय कार्यकर्ते कंत्राटदार व्यापारी हितचिंतक यांनी कार्यक्रमास अगत्यपूर्वक उपस्थित राहावे असे आवाहन चेअरमन प्रा. सुनील शिंत्रे, कार्यकारी संचालक डॉ. टी.ए. भोसले, व्हा. चेअरमन आनंदा कुलकर्णी सह सर्व संचालक मंडळाने केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.