Homeकोंकण - ठाणेऑक्सिजनची चिंता मिटणार,पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला मोठा निर्णय.

ऑक्सिजनची चिंता मिटणार,पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला मोठा निर्णय.

ऑक्सिजनची चिंता मिटणार,पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला मोठा निर्णय
नवी दिल्ली वृत्तसंस्था.
कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील परिस्थिती अतिशय चिंताजनक झाली आहे. ऑक्सिजन आणि बेड मिळत नसल्यामुळे रुग्णांची परवड होत आहे. ऑक्सिजन अभावी लोकांना प्राण गमावावा लागत आहे. या अडचणीच्या प्रसंगी पीएम मोदी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी PM केअर फंडातून एक लाख पोर्टेबल ऑक्सिजन कंटेनरला मंजूरी दिली आहे. बुधवारी झालेल्या उच्चस्थरिय बैठकीत नरेंद्र मोदी यांनी हा महत्वाचा निर्णय घेतला आहे.

कोरोना काळात लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचं व्यवस्थापन कसं करायला हवं, यावर चर्चा झाली. पोर्टेबल ऑक्सिजन कंटेनरच लवकरात लवकर खरेदी करुन गरज असलेल्या राज्यांपर्यंत पोहचवण्याच्या सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या.यापूर्वी पीएम केअर फंडातून 713 पीएसए प्रकल्पांना मंजूरी दिली होती. आता मोदी यांनी पीएम केअर फंडाअंतर्गत 500 नवीन ऑक्सिजन प्लांटलाही मंजूरी दिली आहे. 500 नवीन पीएसएला मंजूरी दिली आहे. यांवा डीआरडिओ आणि CSIR मार्फत स्वदेशी तंत्रानाद्वारे विकसीत केलं जाणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.