माजी वसुंधरा ३.० व स्वच्छ सर्वेक्षण २३ अंतर्गत फटाक्यांच्या मर्यादाबाबतचे पालन करून प्रदूषण टाळावे. – आजरा नगरपंचायतचे आवाहन.
आजरा. – प्रतिनिधी.
आजरा नगरपंचायत वतीने शहरातील नागरिकांना माजी वसुंधरा ३.० व स्वच्छ सर्वेक्षण २३ अंतर्गत फटाक्यांच्या मर्यादाबाबत सुचना करण्यात आली आहे. की भारत सरकार अधिसूचना क्रं. G.S.R ( E ) dt5. १०९९ cn cn अन्वये १२५ DB ( A1 ) पेक्षा जास्त आवाज करणाऱ्या फटाक्यांची निर्मिती विक्री किंवा वापर करणेस मनाई केली आहे अशा फटाक्यांचे उत्पादन विक्री किंवा वापर बेकायदेशीर आहे तसेच आपणास सर्वांना माहीत आहे की आपण वातावरणीय बदला सामोरे जात आहोत वातावरणाच्या बदलाच्या आणि कारणांपैकी हवे प्रदूषण हे एक महत्त्वाचे कारण आहे विविध सण उत्सव प्रसंगी आपण आवाजात असलेल्या फटाक्यामध्ये कार्बन व सल्फर चे प्रमाण अधिक असते जे विषारी वायुनी क्षेनी तयार करतात ही वायू वनस्पती प्राणी पक्षी तसेच मानव प्रजातीस हानी पोहोचवतात हवेत प्रदूषण थांबवण्याची क्रिया आपण स्वतः पासून सुरू करूया सबब माजी वसुंधरा अभियान अंतर्गत येणाऱ्या दिपावली सण उत्सवात फटाके वाजविण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. तरी सर्व नागरिकांनी या अंमलबजावणी करावी असे आवाहन आजरा नगरपंचायत वतीने करण्यात येत आहे.