Homeकोंकण - ठाणेमिरा भाईंदर शहरामध्ये मराठा भवनाचा भुमीपूजन सोहळा होणार. - १५...

मिरा भाईंदर शहरामध्ये मराठा भवनाचा भुमीपूजन सोहळा होणार. – १५ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी १० वा.- या ऐतिहासिक सोहळ्यात सर्व मराठा समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे अवाहनआमदार प्रताप सरनाईक यांनी केले.

मिरा भाईंदर शहरामध्ये मराठा भवनाचा भुमीपूजन सोहळा होणार. – १५ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी १० वा.

मुंबई. – प्रतिनिधी.

मिरा भाईंदर शहरातील मराठा समाजाला संघटित करून त्यांच्या उत्कर्षासाठी कार्यरत राहणे साठी मीरा-भाईंदर मराठा संघ यांच्या गेली कित्येक वर्ष केलेल्या मागणीनुसार व मराठा समाजाचे लोकप्रिय आमदार प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्रातील पहिले भव्य दिव्य असे १६ मजली मराठा भवन मिरा भाईंदर शहरात साकारत आहे.
या मराठा भवनामध्ये १२ मजली महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांकरीता वसतिगृह, सभा समारंभा करिता तीन हॉल, अभ्यासिका, लायब्ररी, प्रशिक्षण केंद्र असे विविध उपक्रमाकरिता जागा उपलब्ध करण्यात आली आहे.
सदर मराठा भवनाचा भूमिपूजन सोहळा शनिवार दिनांक १५ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी १० वा. भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृह, प्रसाद हॉटेल शेजारी, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, मिरा भाईंदर येथे खालील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. युवराज संभाजी राजे छत्रपती यांच्या शुभ हस्ते व ना.कपिल पाटील केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज केंद्र सरकार यांच्या अध्यक्षतेखाली ना. शंभूराज देसाई पालकमंत्री ठाणे जिल्हा, उदय सामंत, उद्योग मंत्री, महाराष्ट्र राज्य, खासदार राजनजी विचारे, आमदार छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले, आमदार प्रताप सरनाईक, आमदार नितेश राणे, आमदार सौ गीता जैन, आमदार निरंजन डावखरे, श्रीमती ज्योतीताई विनायकराव मेटे, राष्ट्रीय अध्यक्षा, शिवसंग्राम, या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
मिरा भाईंदर मराठा संघाच्या वतीने मिरा भाईंदर शहरातील मराठा समाजाला आवाहन करण्यात येत आहे की, आपल्या समाजाचे मराठा भवन निर्माण होणे ही स्वप्नपूर्ती कडे वाटचाल असून आपण सहकुटुंब या कार्यक्रमास उपस्थित राहावे व कार्यक्रमाची शोभा वाढवावी. सदर कार्यक्रमात सकल मराठा समाज मिरा भाईंदर, मराठा मित्र मंडळ पेणकर पाडा, सकल मराठा समाज प्रतिष्ठान रामदेव पार्क, सहभागी असून या ऐतिहासिक सोहळ्यात सर्व मराठा समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आमदार प्रताप सरनाईक मिरा भाईंदर मराठा संघाचे अध्यक्ष सुरेश दळवी,कार्याध्यक्ष मनोज राणे, सरचिटणीस रमेश पवार इतर सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.