गणेशभक्त कोकणवासिय प्रवासी संघ, मुंबईचे समाजसेवी उपक्रमाला सहकार्य करण्याचे आवाहन
मुंबई उपनगर (शांताराम गुडेकर )
गणेशभक्त कोकणवासिय प्रवासी संघ, प्रवाशांच्या सोयीसाठी सातत्याने कार्यरत असताना सुध्दा शैक्षणिक, सामाजिक,वैद्यकीय उपक्रमही सुरु असतात.अनाथाश्रमला भेट देणे,आपल्या कुवतीनुसार रोख देणगी,विषेशत:वस्तू रूपाने देणगी देत असतात.वणवण फिरणा-या निराधारांना आधार देणारा देवदूत,अशी ख्याती असलेले श्री.संदीप परब यांच्या “जीवन आनंद “संस्था संचलित सांताक्रुझ- मुंबई, “समर्थ आश्रम” विरार-ठाणे, आणि “संविता आश्रम” पणदुर (कुडाळ) येथे निराधार व्यक्तींकरीता आश्रम आहे.येथे रस्तावर फिरणा-या अनाथ मुले,निराधार व्यक्ती, निराधार रुग्ण आणुण त्यांची विनामुल्य सेवा केली जाते.त्यात मनोरुग्णांचे प्रमाण अधिक आहे.तरीही त्यांना स्वावलंभी करण्याचा प्रयत्न केला जातॊ.हे काम जनाधारावर चालते.
दोन /तीन वर्षे गणेशभक्त कोकणवासिय प्रवासी संघ गणेशचतुर्थीला”संविता आश्रम” पणदुर, ता.कुडाळ, जिल्हा सिंधुदूर्ग येथील रूग्णांना जेवण, कधी कधी दिवाळीला फराळ, आणि कपडे स्वरूपात मदत करुन संविता आश्रमाला सहकार्य करण्याचा प्रयत्न करीत आहे.यावर्षी मोठ्याप्रमाणात कपडे देण्याचा विचार आहे.गणेशभक्त कोकणवासिय प्रवासी संघाचे प्रमुख संघटक श्री.अनिल भि.काडगे यांनी पुढाकारही घेतला आहे.गणेशभक्त कोकणवासिय प्रवासी संघाच्या वतीने असे आवाहन करण्यात येत आहे की, आपल्या वापरात नसलेले पण सुस्थितीत असलेले कपडे फेकुन किंवा भांडेवालीला न देता व्यवस्थित घडी करून एकत्रित जमा करून गणेशभक्त कोकणवासिय प्रवासी संघाच्या कार्यालयात पोच केल्यास प्रवासी संघाच्या माध्यमातून संविता आश्रमात पोच केले जातील.
पुरुषांचे कपडे: फुल पँट, हाफ पँट, बरमोडा, शर्ट, टी शर्ट, लेंगा, सदरा वगैरे.
स्त्रीयांसाठी कपडे: मॅक्सी, परकर, पंजाबी ड्रेस, टाॅप, लेगिज, वगैरे, (साड्या नको. मनोरुग्णांचे प्रमाण जास्तीत असल्याने त्यांना अंगावरचे कपड्यांचे भान नसते.)मुलांचे कपडे: ३ते१२ वर्षापर्यंतच्या मुला/मुलींचे कोणत्याही प्रकारचे कपडे त्याच प्रमाणे टाॅवेल नॅफकिन, चादर, बेडशीट,चालतील.कृपया कपडे दात्यांनी दिनांक १०/११/२०२२ पर्यंत त्यांचाकडील चांगल्या अवस्थेत असलेले कपडे व्यवस्थित घडी करुन एकत्रित देणे.जेणे करुन आपण दिलेले कपडे आश्रमात पाठविणे आम्हाला सुलभ होईल.त्याच प्रमाणे असे आवाहन गणेशभक्त कोकणवासिय प्रवासी संघाच्या वतीने कार्याध्यक्ष दीपक मा.चव्हाण यांनी केले आहे.कपडे जमा करण्याचे ठीकाण- गणेशभक्त कोकणवासिय प्रवासी संंघ,मुंबई.कार्यालय.साईबाबा मार्ग प्रवासी निवारा (एस्.टी.पिकअप-शेड)
मिंट काॅलनी मोनोरेल स्टेशन जवळ,
साईबाबा मार्ग,परेल. मुंबई ४०० ०१२. अधिक माहितीसाठी श्री.अनिल भि. काडगे.(प्रमुख संघटक): ९८२१२३६१२३ श्री.अशोक नाचरे (कार्यालय प्रमुख): ९८९२३८७१५१/
श्री.रणजित वरवटकर (समन्वयक)-८६५२४४१२१० यांच्याशी संपर्क साधवा.