Homeकोंकण - ठाणेधनुष्यबाण’ चिन्ह नेमकं कोणाचं होणार?निवडणूक आयोग आज निर्णय होणार ?” - चिन्हाचा...

धनुष्यबाण’ चिन्ह नेमकं कोणाचं होणार?निवडणूक आयोग आज निर्णय होणार ?” – चिन्हाचा लढा शेवटच्या टप्प्यात

“‘धनुष्यबाण’ चिन्ह नेमकं कोणाचं होणार?
निवडणूक आयोग आज निर्णय होणार ?” – चिन्हाचा लढा शेवटच्या टप्प्यात

नवी दिल्ली :- वृत्तसंस्था.

राज्यात ठाकरे आणि शिंदे गटामध्ये सुरु असणारे शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हासाठीचा संघर्ष आता संपण्याच्या मार्गावर असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण आज म्हणजे 7 तारखेपर्यंत शिवसेनेच्या दोन्ही गटांना आपली बाजू निवडणूक आयोगात मांडायची आहे. एकीकडे अंधेरीची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे, आजपासून अर्ज भरण्याची प्रक्रियाही सुरु होत आहे. त्यामुळे चिन्हाचा निर्णय काय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची आज कायदेशीर लढाई बाबत वकिलांसोबत महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. आयोगात प्राथमिक रिप्लाय आज सादर करायचा की उद्या यावर बैठकीत विचार होणार असल्याची माहिती समोर येत आहे. आयोगामध्ये प्राथमिक रिप्लाय दिल्यानंतर कागदपत्र दाखल करण्यासाठी शिवसेना वेळ मागण्याची शक्यता आहे. जवळपास सहा ते सात लाख अॅफिडेव्हिट सादर करायचे असल्याने वेळ मिळावा ही विनंती आयोगाला केली जाणार आहे.
सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला केस सुरू असताना चिन्हाबाबात निर्णय घेण्याची परवानगी दिली आहे. या दरम्यान अंधेरीची पोटनिवडणूक देखील जाहीर झाली आहे. या पोटनिवडणुकीचे नोटिफिकेशन उद्या निघणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत उद्यापासून सुरू होणार आहे. या काळात चिन्हाचा निर्णय काय होतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. कारण चिन्हाबाबत केस आयोगाच्या दारात पोहचल्यानंतर लगेच निवडणुका असतील तर अनेकदा चिन्ह तात्पुरते गोठवले गेल्याचा इतिहास आहे. त्यामुळे या केसमध्ये त्याचीच पुनरावृत्ती होतेय का हे पाहावं लागेल. आज ठाकरे गटाकडून काय बाजू सादर होते यावर हा निर्णय अवलंबून असणार आहे.
चिन्हाची केस मुळात आयोगासमोर अजून नीट आलेलीच नाही. अजून दोन्ही बाजूंची कागदपत्रंही आयोगासमोर नाहीत. त्यामुळे निवडणूक जाहीर होतानाची स्थिती आयोगाला कायम ठेवावी लागेल. धनुष्यबाण आम्हालाच मिळेल, असा ठाकरे गटाचा दावा आहे. तर शिंदे गटाचा दावा आहे की, विधीमंडळ पक्षातला आमचा दावा आयोगासमोर पोहचला आहे. लोकसभा, विधानसभेत आमच्या गटाला अधिकृत मान्यता आहे. ठाकरे गट वेळकाढूपणा करुन चिन्ह टिकवू पाहत असले तरी आमच्या तक्रारीची दखल घेत अंतिम निर्णय होईपर्यंत चिन्ह गोठवलंही जाण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.