शिवसेनेचा आणखी एक नेता अडचणीत.- आमदार वैभव नाईक यांची एसीबीकडून चौकशी. –
तर ८ दिवसांचा दिला वेळ
( दरम्यान १२ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी येथे उपस्थित राहण्यासंदर्भातही आमदार वैभव नाईक यांना देण्यात आले पत्र. )
सिंधुदुर्ग :- प्रतिनिधी.
आर्थिक व्यवहारा प्रकरणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील आणखी एक नेता अडचणीत सापडला आहे. सिंधुदुर्गमधील उद्धव ठाकरेंच्या गोटातील आमदार वैभव नाईक यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अर्थात एसीबीनं चौकशी केली.तब्बल अर्धा तास एसीबीनं चौकशी केली. त्यानंतर २० वर्षांतील उत्पन्नाचा हिशोब देण्यासाठी वैभव नाईक यांना ८ दिवसांचा वेळ दिला आहे.
कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांची शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी यांच्या कडून चौकशी झाली. साधरणपणे अर्धा तास वैभव नाईक यांची चौकशी करण्यात आली. एसीबीने वैभव नाईक यांना १/१/२००२ ते २९/ ९ /२०२२ या कालावधीतील उत्पनाची चौकशी केली. त्याशिया याचा तपशील देण्यासाठी वैभव नाईक यांना ८ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. आठ दिवसांत सर्व माहिती देण्याचे आदेश एसीबीनं वैभव नाईक यांना दिले आहेत.
लाचलूचपत प्रतिबंधक रत्नागिरी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आमदार वैभव नाईक यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात आली. कणकवलीत शासकीय विश्रामगृहावर वैभव नाईक यांची चौकशी झाली. लाचलूचपत प्रतिबंधक रत्नागिरी विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुशांत चव्हाण हे पथकाकडून आमदार नाईक यांची चौकशी केली.दरम्यान १२ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी येथे उपस्थित राहण्यासंदर्भातही वैभव नाईक यांना पत्र देण्यात आले आहे.त्यामुळे अनिल परब यांच्यानंतर कोकणातील म्हणजेच सिंधुदुर्गातील शिवसेनेचा आणखी एक नेता अडचणीत सापडला आहे
