आजरा साखर कारखान्याचा दसऱ्याच्या शुभमुहुर्तावर बॉयलर अग्नी प्रदीपन कार्यक्रम संपन्न.
आजरा. – प्रतिनिधी.

आजरा साखर कारखान्याचा दसऱ्याच्या शुभमुहुर्तावर २४ वा. बॉयलर अग्नी प्रदीपन कार्यक्रम बुधवार दि. ५ रोजी स. ११ वा. प. पू. धर्माचार्य भगवानगिरी महाराज रामनाथगिरी समाधी संस्थान मठ. क.नुल ता. गडहिंग्लज यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये व मान्यवर संचालक मंडळाचे हस्ते झाला. बॉयलर अग्नी प्रदीपनाचा होम विधी कार्यक्रम कारखान्याचे संचालक श्री. व सौ. दशरथ अमृते, दिपाली अमृते या उभयतांचे हस्ते झाले. यावेळी सर्व संचालक उपस्थित होते.
कारखान्याच्या गाळाचा शुभारंभ देखील लवकरच करणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन सुनिल शिंत्रे यांनी दिली. कारखान्यांचे ४५००० में टन गाळाचे उद्दिष्ट निश्चित केले असून त्यासाठी सुरुवात म्हणून बॉयलर अग्नी प्रदीपन कार्यक्रम आयोजित केला होता. त्यासाठी सर्व संचालक सभासद, शेतकरी, कंत्राटदार यांनी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार व्हा. चेअरमन आनंदराव कुलकर्णी यांनी मानले