जगन्नाथांचा रथ हाकायला सर्वांची गरज असते. – प. पू. धर्माचार्य भगवानगिरी महाराज.
( आजरा कारखाना बॉयलर अग्नी प्रदीपन कार्यक्रम संपन्न. )
{ दि. १७ ऑक्टोबर २०२२ पासून कारखाना गळीत हंगामाची होणार सुरवात. }
आजरा. – प्रतिनिधी.

जगन्नाथांचा रथ हाकायला सर्वांची गरज असते सर्वांच्या मदतीमुळे बंद पडलेला आजरा साखर कारखाना चालू झाला. ही शेतकऱ्यांच्या भल्याची गोष्ट आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी पुढे येऊन कारखाना चालू केला व या पुढील उद्दिष्ट स्वयंपाळावर चालवण्यासाठीचे आहे. ही बाब म्हणजे कारखान्यातील सर्व संचालकांची चांगली एकजूट आहे. आजरा साखर कारखान्याचा दसऱ्याच्या शुभमुहुर्तावर २४ व्या बॉयलर अग्नी प्रदीपन कार्यक्रम बुधवार दि. ५ रोजी स. ११ वा. प. पू. धर्माचार्य भगवानगिरी महाराज रामनाथगिरी समाधी संस्थान मठ. क.नुल ता. गडहिंग्लज यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला याप्रसंगी प.पू भगवानगिरी महाराज
बोलत होते. अध्यक्षस्थानी चेअरमन सुनील शिंत्रे होते. प्रस्ताविक व स्वागत कार्यकारी संचालक तानाजी भोसले यांनी केले. पुढे बोलताना प.पू भगवानगिरी महाराज महाराज म्हणाले
कारखान्याच्या माध्यमातून शैक्षणिक सांस्कृतिक वनराई असे वेगवेगळे कार्यक्रम राबवता येतात यासाठी देखील संचालक मंडळाने प्रयत्न करावे. सोबत उत्पादन क्षमता वाढली पाहिजेत, उतारा चांगला आला पाहिजे, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना व सभासदांना लाभ चांगला दर मिळाला पाहिजेत चेअरमन प्रा. सुनील शिंत्रे मन लावून, सर्व संचालकांना सोबत घेऊन काम करत असल्याने यामुळे कारखाना चांगल्या स्थितीत आहे. शेवटी संतांचा विचार आत्मसात करा व तन – मन लावून कारखान्याला मदत करा. सर्वांचे कल्याण होईल. असा संदेश भगवानगिरी महाराजांनी यावेळी दिला. यावेळी चेअरमन सुनिल शिंत्रे अध्यक्षस्थानावरुन कारखान्याच्या २४ व्या गळीत हंगाम बॉयलर अग्नी प्रदीपनाचा होम विधी कार्यक्रमात बोलताना म्हणाले कारखान्याच्या मागील गळीत हंगाम २०२१/२२ हा यशस्वीरित्या चालवून ३५००७४.६९१ में टन उसाचे गाळप १२.४२ इतका साखर उतार ठेवून ४३४०५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले कारखान्याने या हंगामात असलेल्या संपूर्ण उसाची बिले तसेच तोडणी वाहतूक कंत्राद्वारांची दिले त्यांचे खातेवर मुदतीत जमा केले आहेत. तसेच कारखान्यास मालपुरवठा करणारे व्यापारी कंत्राटदार यांचे देखील मागील हंगामातील सर्व बिले अदा केली असून कर्मचाऱ्यांनी वेतन कपात करून कारखाना सुरू करण्यास मोलाचे सहकार्य केले यामुळे त्यांचे ठरलेले वेतन वेळेत अदा होत आहे. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांना या वर्षात त्रिपक्षीय करारात निश्चित केलेले १२ टक्के वेतन वाढ माहे जानेवारी २०२२ पासून लागू करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ज्या त्यावेळी लागू झालेली पगारांमध्ये वाढ करणे बाबत सततचे मागणीचा विचार करून संचालक मंडळाने १० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला असून ऑक्टोबर २०२२ पासून त्यांची कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व कारखान्याचा ऊस दराबाबत निर्णय झालेला आहे. त्याचप्रमाणे आपला कारखाना देखील शासनाने ठरवून दिलेली एफआरपीची रक्कम वेळेत अदा करण्याचे नियोजन संचालक मंडळाने केलेले आहे. पुढील वर्षात कारखाना कार्यक्षेत्रात उसाचे उत्पादन वाढ व्हावे. यासाठी ऊस विकास योजना कारखान्या मार्फत प्राधान्याने राबविल्या जाणार आहेत. त्यामध्ये कारखाना कार्यक्षेत्रामध्ये सद्या पाण्याचा ताण सोसून जादा उत्पादन देणाऱ्या नव – नवीन जातीच्या लागण वाढवण्याचे नियोजन केले असून सद्या कारखान्याने प्रयोगिक तत्त्वावर को. व्ही. एस आय १८१२१ या वाणाचे वाटप कार्यक्षेत्रात केले असून पुढील हंगामात याजातीचा जास्तीत जास्त वापर व्हावा या दृष्टीने कारखान्यामार्फत प्रयत्न केले जाणार असून त्याचे प्रमाण ऊस उत्पादकांना वाढ व्हावी. यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांनी सुचवलेले वसंत ऊर्जा हे संजीवक कारखान्याच्या मार्फत सभासद शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पुरवण्याची नियोजन केले आहे. कारखाना मार्फत पुढील वर्षात ऊस उत्पादक वाढ करण्याच्या दृष्टीने ऊस पिक स्पर्धा आयोजित केली आहे. आज अखेर कारखान्याचे मशनरी देखभाल दुरुस्तीचे काम कारखाना कर्मचारी यांनी वेळेत करण्याचे नियोजन करून आज बॉयलर अग्नी प्रदीपणासाठी बॉयलर सज्ज ठेवला आहे. तसेच उर्वरित कामे करून पुढील चार दिवसात सर्व ट्रायल पूर्ण होतील अशी अपेक्षा असून कर्मचाऱ्यांच्या अथन प्रयत्नाला यश येऊन दि. १७ ऑक्टोबर २०२२ रोजी पासून कारखाना गळीत हंगाम सुरुवात होणार आहे. याप्रसंगी सर्व शेतकरी सभासद व कर्मचाऱ्यांना विनंती की आपला पिकवलेला संपूर्ण ऊस कारखान्याकडे पाठवून सहकार्य करावे व आपला कारखाना निश्चित धोरणाप्रमाणे गाळप करण्यासाठी सर्वांनी काम करावे असे आवाहन यावेळी चेअरमन प्रा. शिंत्रे यांनी केले

( बुधवार दि. ५ रोजी आजरा साखर येथे माान्यवर संचालक मंडळाच्या हस्ते झाला. तसेच बॉयलर अग्नी प्रदीपनाचा होम विधी कार्यक्रम कारखान्याचे संचालक श्री. व सौ. दशरथ अमृते, दिपाली अमृते या उभयतांचे हस्ते संपन्न झाले. )
त्यावेळी संचालिका अंजनाताई, रेडेकर सुनिता रेडेकर, संचालक अशोक चराटी, मुकुंद देसाई विष्णुपंत केसरकर, मलिककुमार बुरुड, दिगंबर देसाई, आनंदा फडके, तानाजी देसाई, जनार्धन टोपले, लक्ष्मण गुडुळकर, एम. के. देसाई सह सर्व संचालक, सभासद, शेतकरी, कामगार, कंत्राटदार कार्यक्रमास मोठ्या उपस्थित संख्येने होते. सुत्रसंचालन व्यंकटेश ज्योती यांनी केले. आभार व्हा. चेअरमन आनंदराव कुलकर्णी यांनी मानले.