गोंधळी समाजाने एकजुट राहुन समाजाला प्रगतीच्या दिशेने वाटचाल करावी.- सौ.वैशाली राजमाने; शशिकांत इंगळे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार
कणकवली/विनोद जाधव
कणकवली तालुका गोंधळी समाज संघ कणकवली यांच्यावतीने विराजमान झालेल्या भवानीमातेचा उपक्रम कौतुकास्पद आहे. असेच यापुढेही गोंधळी समाजाने एकजुटीने राहुन सातत्याने समाजाला प्रगतीच्या दिशेने जाण्यासाठी वाटचाल करावी. शासनाकडून लागणारे सहकार्य आम्ही आपल्याला नेहमी करू असा आशावाद सौ.वैशाली राजमाने यांनी केला.
दर्शनासाठी कणकवलीचे प्रांत सौ.वैशाली राजमाने यांनी उपस्थित राहून श्रीमूर्तीचे दर्शन घेतले.
त्यावेळी गोंधळी समाजाच्या वतीने त्यांना आरतीचा मान देण्यात आला.
त्यावेळी उपस्थित गोंधळी समाजाचे सल्लागार श्री शिवाजी भिसे , मराप्पा इंगळे, हनुमंत इंगळे,रमेश कांबळे,विनोद इंगळे, विजय म. इंगळे ,शंकर वाघमारे, कृष्णा इंगळे,दिपक वाघमारे, विजय का.इंगळे,राजू इंगळे, अनिल शि. इंगळे, तसेच अन्य समाज बांधव उपस्थित होते. तसेच कणकवलीचे प्रांत सौ.वैशाली राजमाने यांना गोंधळी समाजतर्फे सामाजिक कार्यकर्ते श्री शशिकांत इंगळे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी गोंधळी समाजाने सौ.वैशाली राजमाने यांचे आभार मानले.