माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना मोठा दिलासा. – ११ महिन्यांनंतर ईडीच्या केसमध्ये जामीन मंजूर.
( तर सीबीआयच्या केसमध्ये अनिल देशमुख यांना जामिन मिळेपर्यंत जेलमध्ये राहावं लागणार आहे. १३ तारखेला होणार सुनावणी.)
मुंबई:-प्रतिनिधी.

अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाकडून मंजूर करण्यात आला आहे. न्यायमूर्ती एम जे जामदार यांच्या खंडपीठाने यावर निर्णय दिला.
कथित शंभर कोटी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. जवळपास ११ महिन्यानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली होती. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाला निर्देश दिल्यानंतर जामीन अर्जावर मागील आठवड्यात सुनावणी पूर्ण करण्यात आली होती. मात्र निकाल राखीव ठेवला होता. आज अखेर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.