Homeकोंकण - ठाणेराष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती दिनी संवेदना फाउंडेशन आजरा व कै भूषण गुंजाळ...

राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती दिनी संवेदना फाउंडेशन आजरा व कै भूषण गुंजाळ मित्र मंडळ आयोजित. – ‘संवेदना भूषण ‘मित्रत्वाला उजाळा देणारा उपक्रम.

राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती दिनी संवेदना फाउंडेशन आजरा व कै भूषण गुंजाळ मित्र मंडळ आयोजित. – ‘संवेदना भूषण ‘मित्रत्वाला उजाळा देणारा उपक्रम.

आजरा. – प्रतिनिधी.

आजरा येथे दि.२ ऑक्टोंबर राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून संवेदना फाउंडेशन आजरा व कै भूषण गुंजाळ मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कै. भूषण गुंजाळ स्मृती प्रितर्थ गंगामाई वाचन मंदिर आजरा येथे आजरा तालुक्यातील ६० गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व संवेदना भूषण टीमचे प्रमुख संजय हरेर होते. प्रास्ताविक संवेदना सचिव संतराम केसरकर सर यांनी केले. यावेळी पं. स. प्र. बीडीओ सुधाकर खोराटे म्हणाले.
मित्रत्वाला पारिभाषित करणारा उपक्रम संवेदना फाउंडेशन गेली पाच वर्ष आजरा येथे राबवत आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटत आहे. असे बोलताना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री खोराटे म्हणाले. यावेळी संवेदना वैद्यकीय टिम, आजरा तालुका डॉ. असोसिएशन वतीने सर्व विद्यार्थ्यांची प्रथम आरोग्य तपासणी करून मोफत औषध उपचार करण्यात आले. संवेदना फाउंडेशनचा आढावा व संवेदना भूषण कार्यक्रमाची माहिती दिली.यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संवेदना रक्तदान शिबिर मधील २१३ रक्तदात्यांना संवेदना तर्फे आभार पत्र व संवेदना भेट वस्तू प्रदान करण्यात आले. डॉ. प्रवीण निंबाळकर यांनी संवेदना संजीवनी मेडिकल लायब्ररी ची संपूर्ण माहिती दिली.
श्री.तानाजी पावले सरांनी संवेदनाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. आजरा तालुक्यातील ६० गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेटवस्तू प्रदान करण्यात आले. यावेळी मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे अश्रू पाहण्यात आले. खऱ्या अर्थाने मित्रत्वाला परिभाषित करणारा कार्यक्रम वाटत आहे असे उध्दगार झोका इन्फोटेन्मेंटचे संचालक संजय भोसल यांनी काढले. संवेदना निसर्ग मित्र गिरीधर रेडेकर यांनी जैवविविधता पार्क, मियावाकी प्रकल्प सुळे येथील या प्रकल्पाची माहिती दिली. संवेदनाच्या आगामी उपक्रमा संदर्भात समीर कातकर इयत्ता ७वी प्रज्ञाशोध परीक्षा घेणे.निवडक विद्यार्थांना विज्ञानाची गोडी निर्माण होण्यासाठी संवेदना वतीने वारणा सायन्स सेंटरला भेट देणे. संवेदना वार्षिक मीटिंग ठिकाण किल्ले वासोटा ता. सातारा या आगामी उपक्रमांची माहिती दिली.
या कार्यक्रमाला संवेदना सदस्य व झोका इन्फोटेन्मेंटचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मारुती डेळेकर सरांनी केले तर आभार सुरेश देशमुख यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.