Homeकोंकण - ठाणेआजरा कारखाना जिल्हा बँकेच्या सहकार्याने स्वयंबळावर चालवण्याचे नियोजन. - चेअरमन सुनिल शिंत्रे....

आजरा कारखाना जिल्हा बँकेच्या सहकार्याने स्वयंबळावर चालवण्याचे नियोजन. – चेअरमन सुनिल शिंत्रे. ( ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न. )

आजरा कारखाना जिल्हा बँकेच्या सहकार्याने स्वयंबळावर चालवण्याचे नियोजन. – चेअरमन सुनिल शिंत्रे. ( ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न. )

आजरा. – प्रतिनिधी.

आजरा साखर कारखान्याने सन २०२१/२२ या वार्षिक आधिमंडळाची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार दि. २९ रोजी कारखाना कार्यस्थळावर गवसे. ता. आजरा येथे संपन्न झाली. कारखान्याचे चेअरमन सुनील शिंत्रे अध्यस्थावरुन प्रास्ताविक व स्वागत करताना म्हणाले आजरा साखर कारखाना या वार्षिक वर्षांमध्ये कारखान्याने सरफेसी कायद्याअंतर्गत ताब्यात घेतलेला कारखाना कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्र बाहेर वेगवेगळ्या संस्था व व्यक्तिगत ठेवी स्वीकारून बँकेचे कर्ज परतफेड करून कारखाना व्यवस्थापनाने स्वयंपाळावर चालण्याचा निश्चय करून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सहाय्याने पुन्हा कर्ज उभारणी करून गळीत हंगाम २०२१/२२२ यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे. या हंगामात ३५००७४.६९१ मे. टन उसाचे गाळप करून ४३४०५० क्विंटल साखर उत्पादित केली या हंगामातील सर्व ऊस बिले तोडणी वाहतूक बिले कामगार पगार तसेच कंत्राटदार व व्यापाऱ्यांची बिले वेळेत आला केली आहेत. कारखान्याने सन २०१८/१९ हंगामातील ३१३०४७.३८३ मे. टनाची देय असणारी ऊस बीले रू ४९३.८८ प्रमाणे रू १५३७.५७ लाख देय होती आज अखेर रु. ४२१.६० लाख थकीत तोडणी वाहतुकीपोटी कंत्रालदारांना अदा केली आहे. उर्वरित शिल्लक असलेली रक्कम रु. १११.१० लाख येत्या गळीत हंगामात देण्याची व्यवस्था करीत आहोत.
साखर उत्पादकांना नंतर आवश्यक साखर विक्री करता माहे डिसेंबर २०२१ अखेर रिलीज न आल्याने साखर विक्री करता आलेले नाही त्यामुळे कारखान्यावर व्याजाची आकारणी जादा झाली आहे. तसेच यापूर्वी देणे देणे करता ठेवी स्वीकारून दिले असली तरी व्याजावर जादा खर्च पडलेला आहे त्यामुळे आज अखेर कारखान्यावर असलेले कर्जाचा बोजा ज्यादा दिसत आहे. आज अखेर कारखान्यावर रु १५६४६.११ लाख इतके कर्ज असून पैकी शासकीय व इतर कर्ज रु. १२०९९.४० लाख व मालतारण अंदाजे ४२००.०० लाख इतकी जमा होण्याची शक्यता आहे. ११४४६.११ लाखा पैकी तोडणी वाहतूक यंत्रणे करीता ८००.०० लाख खर्च झालेला आहे. सद्यस्थितीत कारखाना व्यवस्थापनाने चांगल्या प्रकारचे नियोजन केले आहे आज अखेर कारखान्याचे ओहरहोलिंग चे काम अंतिम टप्प्यात असून ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात आजरा साखर कारखाना चालू करण्याचे नियोजन केले आहे. तसेच सक्षम तोडणी यंत्रणा भरून हंगाम काळात जास्तीत जास्त गाळप करण्याचे नियोजन केले असून कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांचा ऊस वेळेत कारखान्यावर गाळापासाठी येईल याची दक्षता घेणार आहे. केंद्र शासनामार्फत मागील हंगामात ओपन जनरल लायसन्स अंतर्गत साखर निर्यातीकरिता खुली ठेवण्यात आली होती त्यामुळे जागतिक बाजारात साखर गेले ने साखर जे दर थोडे जादा मिळाले परंतु माहे मी 2022 नंतर केंद्र शासनाने निर्यात साखरकरता बंदी आणून मर्यादित कोटा देण्याचे अवलंबिले ने साखर विक्रीवर परिणाम होऊन साखर शिल्लक राहिल्याने साखरेचे दर घसरत चालले आहेत त्यामुळे येत्या हंगामात केंद्र शासनाने ओपन जनरल लायसन्स अंतर्गत जागतिक बाजारामध्ये साखर विक्री केली पर्यायाने कारखानदारीला त्याचा लाभ होईल त्याप्रमाणे केंद्र शासनाने ठरवलेल्या एम. एस. पी मध्ये वाढ करणे गरजेचे असून किमान रु. ३५०० एम. एस. पी जाहीर करावी जेणे करुन कारखानदारी सोबत उत्पादक शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.
तसेच इतर कारखान्याच्या बरोबर ऊस दरही वेळेत अदा करणार असले बाबतची माहिती. देण्यात आली तरी सर्व उत्पादकांनी आपला संपूर्ण ऊस कारखान्याकडे पाठवून सहकार्य करावे असे चेअरमन श्री. शिंत्रे म्हणाले. अहवाल वाचन कार्यकारी संचालक तानाजी भोसले यांनी केले. सर्व ठराव मंजूर करण्यात आले.
यावेळी सर्व संचालक सभासद कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार व्हा. चेअरमन आनंदराव कुलकर्णी यांनी मानले.

{ यावेळी सभासदांनी प्रश्नाचा भडीमार केला. यामध्ये इंद्रजीत देसाई, शांताराम पाटील, हरिबा कांबळे, दत्ता पाटील, सुनिल शिंदे, सुधीर सुपल, निवृत्ती कांबळे या सभासदांनी ठराव मंजूर वाचन नंतर करा अगोदर प्रश्नांची उत्तरे द्या.
अशी मागणी केली यावर यापूर्वी सातबारा गोरा दिला होता. आजपर्यंतच्या काही संचालक मंडळाने कर्जाचा सातबारा तयार केला याला जबाबदार सर्व संचालक आहेत.
तर काही कामगार व संचालकांच्या राजकारणामुळे कारखाना बंद पडला होता.
तर ३ हजार सभासदांना ३२ वर्षात सभासदांना काय दिलाय. किमान दिपावलीला साखर द्यावी. अशी मागणी.
सदर कारखाना उभारण्यासाठी सध्या असलेल्या संचालकांचे सभासद नोंदणी व इतर कामासाठी काय योगदान आहे. अशा योगदान असणाऱ्या संचालकांना यापुढे सभासद संचालक म्हणून निवडून देतील. तर कपात केलेला कामगार पगार किमान ७०℅ देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घ्यावा. अशीही मागणी सभासदांनी
.}

[ यामधील काही प्रश्नावर संचालक मंडळामध्ये चर्चा करुन घेऊ व सभासद वाढीव रक्कम बाबत आपले मत शासनाकडे कळवण्यात येईल असे चेअरमन शिंत्रे यांनी सांगितले ]

अभिनंदनाचा ठराव.
युवराज पोवार म्हणाले आजरा कारखाना बंद पडलेला साखर कारखाना असताना पुन्हा सुरू करून गळीत हंगाम पुर्ण केला. ज्या संस्थेने व नेत्यांनी मदत केली त्या सर्वाचा अभिनंदनाचा ठराव घेण्याची विनंती केली. तसेच सभासदांच्या प्रश्नाला एकटे चेअरमन शिंत्रे उत्तर देत आहेत. माजी चेअरमन सर्व संचालक गप्प का बसले आहेत. त्याची काही जबाबदारी आहे काय नाही. असा प्रश्न श्री पोवार यांनी उपस्थित केला
.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.