Homeकोंकण - ठाणेआजरा घनसाळचा सुगंध देशभर दरवळतो. - शेतकऱ्यांनी महत्त्व समजून घ्यावे. खासदार महाडिक.

आजरा घनसाळचा सुगंध देशभर दरवळतो. – शेतकऱ्यांनी महत्त्व समजून घ्यावे. खासदार महाडिक.

आजरा घनसाळचा सुगंध देशभर दरवळतो. – शेतकऱ्यांनी महत्त्व समजून घ्यावे. खासदार महाडिक.

आजरा. – प्रतिनिधी.

आजरा घनसाळ तांदळाचा सुगंध देशभर दरवळतो पण येथील शेतकऱ्यांना त्याचे महत्त्व समजत नाही. तर आजरा मधील काजू देखील स्वादिष्ट आहे. यासाठी भविष्यात चांगली बाजारपेठ तयार करुन चांगले मार्केट तयार करण्यात येईल आत्मनिर्भर भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडाचे औचित्य साधूनभारतीय जनता पार्टी आजरा. शनिवार दि. १ रोजी आयोजित व मेडिकल असो. ऑफ आजरा च्या सहकार्याने मोफत
महा आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिर उद्घाटन कार्यक्रमात खासदार धनंजय महाडिक बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी होत्या.
स्वागत प्रास्ताविक भाजप ता. अध्यक्ष सुंधीर कुंभार यांनी केले. खासदार श्री. महाडिक पुढे म्हणाले वेगवेगळ्या व्यवसायासाठी अनेक उद्योजक व्यवसायासाठी येत आहेत. पण आपल्याकडे जागा उपलब्ध नाहीत.
पण परंतु यातुनचही मार्ग काढून रोजगार व शेतकऱ्यांच्या मुलांना हमीभाव मिळण्यासाठी प्रयत्न करेन. या आरोग्य शिबिराचा लाभ तालुक्यातील नागरिकांनी घ्यावा असे खासदार श्री. महाडिक बोलताना म्हणाले.

{ कै. बाबुराव कुंभार यांच्या कार्याचा
आठवणींचा उजाळा खासदार महाडिक यांनी दिला.
}

कोल्हापूर जिल्ह्यातील नामवंत हॉस्पिटल व तज्ञ डॉक्टर याचे मार्गदर्शन झाले. या शिबीरात
१.अथायु मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, कोल्हापूर. २.कोल्हापूर कॅन्सर सेंटर, कोल्हापूर. ३.घेवडे नेत्र रुग्णालय, आजरा. यांचा सहभाग होता. आजरा तालुक्यातील सर्व गोरगरीब नागरिक यांनी या महा आरोग्य शिबिरचा लाभ घेतला. या शिबिर मध्ये रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत. या अंतर्गत मोफत उपचार केले. भाजपा उद्योग आघाडी आजरा विध्यमाने उद्यमिता प्रोत्साहन संमेलन स्वदेशी स्वावलंबन उद्योजकता प्रोत्साहन परिषद पंडित दीनदयाळ विद्यालय आजरा. येथे आयोजित केले होते.
कालिदासजी बोरकर उद्योजक, बँक ऑफ इंडिया कोल्हापूर अधिकारी, बँक ऑफ बडोदा चे अधिकारी यांचे सहकार्य लाभले. यावेळी जर्नादन टोपले, प्रा. सुंधीर मुंज, अरुण देसाई, नगरसेवक विलास नाईक, डॉ. दिपक सातोस्कर, डॉ. संदिप देशपांडे, इजि. विजय पाटील, समीर चॉद, सचिन इंदुलकर, सचिन पाटील, जर्नादन निऊगरे, उदय सरदेसाई, तसेच मनसे सचिव चंद्रकांत साबरेकर ,भाजपचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार नाथा देसाई यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.