Homeकोंकण - ठाणेपॅनकार्ड क्लब्ज लिमिटेडच्या धनाकांची होते फरपट.- ९० दिवसाची मुदत वाढवली. - भारतातील...

पॅनकार्ड क्लब्ज लिमिटेडच्या धनाकांची होते फरपट.- ९० दिवसाची मुदत वाढवली. – भारतातील अनेक धनाकांचे लिंक ओपन होत नसल्याने..पर्याय 👇

पॅनकार्ड क्लब्ज लिमिटेडच्या धनाकांची होते फरपट.- ९० दिवसाची मुदत वाढवली. – भारतातील अनेक धनाकांचे लिंक ओपन होत नसल्याने..पर्याय 👇

संपादक. – संभाजी जाधव

जगभरात नावारूपाला आलेली पॅन कार्डक्लब मागील काही वर्षापासून बंद झाल्याने गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले होते. परंतु आता दी इनसाॅल्व्हली अँण्ड बॅकर् प्टसी बोर्ड ऑफ इंडिया ( इन्साॅल्हन्सी रेझोल्यूशन प्रोसेस फॉर कॉर्पोरेट पर्सन्स ) रेगुलेशन २०१६ च्या विनिमय ६ नुसार या न्यायालयाने दिलासा दिल्याने सुरेशचंद्र शेठ अंतरिम निर्णय व्यवसायिक सर्व मार्केटिंग प्रतिनिधी व गुंतवणूकदार यांना सूचना देल्या असल्याचे प्रसिध्दीस दिले होते. नॅशनल कंपनी लॉ टिब्युनल मुंबई यांनी पॅनकार्ड क्लब लिमिटेड च्या कार्पोरेट नामधारी निर्णय प्रक्रियेचा प्रारंभाचा आदेश दिला आहे. पॅनकार्ड क्लब लिमिटेड च्या धनाकोंना आपण गुंतवणूक केलेल्या पुराव्यासह आपले गावे २३ सप्टेंबर २०२२ किंवा पूर्वी नोंदवलेल्या पत्त्यावर निर्णय व्यवसायिकाकडे सादर करण्यास सांगण्यात होते.
याबाबत महाराष्टासह भारतातील लाखो या पॅन कार्ड क्लब कंपनीमध्ये कष्टाचे पैसे अडकून राहिले आहेत. आता तरी पैसे मिळतील या आशेने दिलेल्या लिंक वर आपली डॉक्युमेंट जमा करण्याकरीता अनेक केंद्रावर रांगा लावून ग्राहक उभे आहेत. रात्रंदिवस दिलेली लिंक ओपन करून पाहत आहेत. परंतु सदर लिंक ओपन होत नसल्याने सदर गुंतवणूकदार संभ्रम अवस्थेत आहेत. यासाठी ज्या कंपनीने सदर लिंक ओपन करून कागदपत्रे जमा करण्यास सांगितले आहे. ती लिंक ओपन होत नाही यासाठी पर्याय द्यावा अशी मागणी भारतातील अनेक पॅनकार्ड क्लब गुंतवणूकदार धनाकांच्याकडून होत होती. यानुसार ९० दिवस वेळ वाढवून दिला आहे.

यासाठी प्रत्येक विभागामध्ये ज्या पॅन कार्ड एजंट यांनी गुंतवणूकदारांचे पैसे जमा करून पॅन कार्ड कंपनीमध्ये भरून घेतले आहेत. अशा एजंट यांनी प्रत्येक ग्राहकाला संपर्क करावा व ग्राहकांनी देखील आपण ज्या व्यक्तीकडे एजंट कडे पॅन कार्ड मध्ये गुंतवणूक केली आहे. त्यांना संपर्क करावा. व एजंट हात वर करत आहेत. असे समजते असे न करता त्याची जबाबदारी आहे. गुंतवणूक ग्राहकांना मदत करणे एजंट यांना बंधनकारक आहे

डिलाईट इंडिया इन्साॅल्व्हन्सी प्रोफेशनल्स एल एलपी. येथील कार्यालयाने मदत करावी. – या मागणीला यश.

[ वित्तीय धनाकांना पुराव्यासह त्याचे दावे फक्त इलेक्ट्रिकनिक साधनाद्वारे inpclip@deloitte.com या ईमेलवर व डिलाईट इंडिया इन्साॅल्व्हन्सी प्रोफेशनल्स एल एलपी २७ वा मजला टाॅवर ३ वन इंटरनॅशनल सेंटर सेनापती बापट मार्ग एलफिस्टन प. मुंबई ४०००१३ या पत्त्यावर सादर करावेत. अन्य सर्व धनाकांना पुराव्यासह आपले दावे व्यक्तिशः टपालाने किंवा इलेक्ट्रॉनिक साधनाद्वारे सादर करू शकतात. पण लिंक बंद असते, नोंदणी क्रमांक १२ मध्ये सूची मध्ये केल्याप्रमाणे विवक्षित सव्वा वर्गातील वित्तीय धनाकोंचे प्रपत्र सीए मध्ये संवर्गाचा वित्तीय गुंतवणूक धारक प्रतिकृत प्रतिनिधी म्हणून काम करण्याकरता नोंदणी क्रमांक १३ मध्ये सूचीबद्ध केलेल्या तीन नाधारी व्यवसायांपैकी त्यांच्या पसंतीचा प्रतिकृती निदर्शनास करावा दाव्याचे बनावट किंवा दिशाभूल करणारे पुरावे सादर केल्यास दंड करण्यात येईल अशी माहिती दिलेली होती परंतु यामध्ये यापूर्वी आपली कागदपत्रे जमा केलेली काही ग्राहक आहेत. तर काही ग्राहक मयत आहेत. त्यांच्या वाससांना वेगळा पर्याय द्यावा. अशी काही ग्राहकांची मागणी आहे. ]

आपल्याला वरीलप्रमाणे देण्यात आलेली माहिती व तसेच RIP ( प्रशासक ) ऑर्डर याप्रमाणे आपली पॅनकार्डमधील लागणारी गुंतवणुकीची कागदपत्रे २३ सप्टेंबर २०२२ वरील दिलेल्या EMAIL, WEBSITE जमा करावी. १) पॅनकार्ड मेंबरशिप सर्टिफिकेट झेरॉक्स
२) BANK PASSBOOK XEROX
३) आधार कार्ड झेरॉक्स.
अशी माहिती राजेश शेठ यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आली होती. या आधारे सदर बातमी प्रसिद्धी करण्यात आले आहे. दिलेली लिंक ओपन होत नसल्यामुळे या वेबसाईटवर भार येत असल्याने सर्वांनी आपली कागदपत्र जमा करण्यासाठी ९० दिवसांचा काळ वाढवून देण्यात आला आहे

परंतु पॅन कार्ड धारक सदर बातमी धारकांना संपर्क करून अधिक माहिती विचारत आहेत. अशा ग्राहकांना सूचना पॅन कार्ड संदर्भातली प्रसिद्ध झालेली माहिती व आपल्याला आपली गुंतवणूक केलेले पैसे मिळण्यासाठी मदत व्हावी. हे आमचं काम होतं.
आपण सर्वांनी आपल्या एजंटला भेटून आपली माहिती कागदपत्रे जमा करण्याबाबत मदत. घ्यावी..
परंतु दिलेल्या निकालाच्या आधारे पॅन कार्ड धारकांनी जी गुंतवणूक केली आहे. . या अनुषंगाने याबाबत केंद्र शासनाने विचार करावा. . अशी मागणी होत आहे.
पॅन कार्ड क्लबच्या ग्राहकांची पुन्हा एकदा एकजूट झाली आहे. या एकजुटीतून हा लढा उभारणे गरजेचे असल्याचे गुंतवणूकदार ग्राहकांचे मत ऐकायला मिळते. पण आता ग्राहकांसाठी दिवस वाढवून देणे आता हा प्रश्न मार्गी लागेल अशी आशा आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.