आजरा मडिलगेत गोकुळ दूध संघामार्फत लम्पी प्रतिबंधक लसीकरण मोहीम..
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा मडिलगेत गोकुळ दूध संघामार्फत लम्पी प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबण्यात आली.
लम्पी त्वचारोग हे संकट लवकर दूर होऊदे शेतकरी वर्गाच्चा जनावरांना कोणतीही हानी होऊ नये यामध्ये गाय, बैल व वासरू या प्रवर्गातील जवळपास ९९ % हुन अधिक लसीकरण झालेची नोंद झाली. यावेळी श्री हनुमान समूह प्रमुख के. व्ही. येसणे व सर्व पदाधिकारी, कर्मचारी वर्ग, सामाजिक कार्यकर्ते आनंद घाटगे, युवराज येसणे, बापू निऊंगरे, सरपंच गणपतराव आरळगुंडकर, श्रीराम दूध संस्थेचे सेक्रेटरी, पांडुरंग सुतार, सर्व पदाधिकारी व कर्मचारी वर्ग, भाग्यलक्ष्मी संस्थेचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी, लोकमान्य दूध संस्थेचे चेअरमन मारुती येसणे, सर्व पदाधिकारी व कर्मचारी वर्ग तसेंच गोकुळ दूध संघाचे पशुवैधकीय अधीकारी लोखंडे व त्यांचा स्टाफसह धोंडिबा कडगांवकर , तसेच गणेश देसाई, विनायक पाटील, निरंजन कडगांवकर, मारुती ऱ्हाटवळ, सदाशिव पोवार, अनिल भोगले व मडीलगे गावातील पशुपालक शेतकरी, ग्रामस्थ तरुण उपस्थित होते.
शेतकऱ्यांना गोठ्यात दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.
जरी लसीकरण झाले असेल तरी सतत पशुपालकांनी आपला गोठा स्वच्छ ठेवावा
गोठ्यात डास, माशा, गोचिड निर्मूलनासाठी आवश्यक ती उपाययोजना करावी.
सायंकाळच्या वेळी गोठ्यात कडुलिंबाच्या पाल्याचा धुर करावा. शक्य असेल तर गोठ्यात हवा खेळती राहील अशी व्यवस्था करावी जेणेकरून मुक्या जनावरांवर आलेलं संकट कोणत्याही प्रकारची हानी करणार नाही.आशा सुचना यावेळी देण्यात आल्या.
