Homeकोंकण - ठाणेऊस शेती व रिलायन्स फाउंडेशनच्या हेल्पलाईन सेवेतून मिळाले भरघोस उत्पन्न, बांधले स्वतःचे...

ऊस शेती व रिलायन्स फाउंडेशनच्या हेल्पलाईन सेवेतून मिळाले भरघोस उत्पन्न, बांधले स्वतःचे पक्क्या बांधकामाचे घर

ऊस शेती व रिलायन्स फाउंडेशनच्या हेल्पलाईन सेवेतून मिळाले भरघोस उत्पन्न, बांधले स्वतःचे पक्क्या बांधकामाचे घर

सांगली. – प्रतिनिधी.

सांगली जिल्ह्यातील वाळवा हा जास्त पावसाचा भाग म्हणून ओळखला जातो. वाळवा तालुका दक्खन पठार म्हणजे पश्चिम घाट ह्या भागात येतो व गरम अर्ध रखरखीत पर्यावरणीय भागामद्धे आहे. या भागामध्ये नेहमीच पावसाचे प्रमाण हे उस शेतीसाठी उपयुक्त असते व ह्या भागाला ‘शुगर बेल्ट’ म्हणले जाते. ह्या भागात सरासरी ४७३ मिमी पाऊस पावसाळ्यात पडतो. त्यामुळे जिल्ह्यामध्ये पाण्याची उपलब्धता जास्त असल्याने विहिरी,उपसा सिंचन,कालवे याचे प्रमाण जास्त असल्याने सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यामध्ये दोन्ही रब्बी व खरीप हंगामामध्ये पिके येथील शेतकरी घेत आसतात. मातीचा प्रकार इकडे उथळ काळी माती आहे आणि त्यात लोहाचा प्रमाण जास्त आहे कारण मुरूम माती आहे. त्यामध्ये उस,भाजीपाला, मका, सोयाबीन इत्यादि मुख्य पिके शेतकरी घेतात. कृषी तज्ज्ञांच्या मते, पिकाची योग्य काळजी आणि उपचारानंतर चांगल्या दर्जाचे बियाणे घेतल्यास चांगले उत्पादन मिळू शकते . परंतु शेतकऱ्यांना शेती करत असताना योग्यवेळी योग्य मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळत नाही. रा. रेठरे हरणाक्ष , ता. वाळवा , जि. सांगली येथील उस उत्पादक शेतकरी श्री. विनायक मारुती मोरे या शेतकऱ्यांने रिलायन्स फौंडेशन यांच्या मार्फत हंगामानुसार उस पिकासंदर्भात खत व्यवस्थापन व कीड व्यवस्थापन , हवामान यासंदर्भात शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवरती दररोज व्हाईस मसेज दिला जातो तसेच १८०० ४१९ ८८०० या हेल्पलाइन सेवांच्या माध्यमातून मिळणाऱ्या मार्गदर्शनामुळे उस पिकाचे भरगोस उत्पन्न मिळवले आहे. विनायक मोरे हे आपल्या कुटुंबासोबत त्यांचे आई व वडील ह्यांच्यासोबत रेठरे हरणाक्ष, ता. वाळवा , जि. सांगली येथे राहतात. या ठिकाणी त्यांची वडीलोपार्जित २ एकर ओलीताची शेती आहे. ओलीतासाठी शेतामध्ये उपसा सिंचन व विहीर आहेत. या शेतीत उस, मका, सोयाबीन ही प्रमुख पिके घेतात. श्री. मोरे सांगतात की ते अगोदर शेती पारंपरिक पद्धतीने म्हणजे वडील पूर्वी ज्या पद्धतीने शेती करत होते त्या पद्धतीने शेती करत होते. त्यामुळे त्यांना शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान माहिती नव्हती. उस पीक करताना घरगुती प्रकारचे बियाणे वापरणे तसेच सरि सोडताना अडीच ते तीन फुटची सोडत होतो. व्यवस्थापन करताना युरिया , 15:15:15 आणि तीन ते चार वर्षातून एखादा शेणखत जमिनीमध्ये टाकत होतो.
मशागत, बियाणे निवड, पिकाच्या दोन ओळींमधील अंतर, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, कीड व रोग यांचे नियंत्रण,आधुनिक तंत्रज्ञान, माती परीक्षण अशा बऱ्याच गोष्टीची त्याना माहिती मिळतच नव्हती. शेतीची मशागत हि करताना रोटा वेटर किंवा बैल जोडी यांनी जमिनीची मशागत करत होतो तसेच माती परीक्षण कधी केलेले नाही तसेच उस पिकाची लागवड करण्याअगोदर बेसल डोस देत नाही. शेती करत असताना पिकावरती कोणता कीड किंवा रोग पडला तर जे औषध कृषिसेवा केंद्र दुकानदार देत होते त्याची फवारणी करत होते. ती औषधे खूप महागडी होती. व कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे यावरून औषधाची फवारणी करत होते. अतिरिक्त रासायनिक खत वापरत असल्याने जमिनीचा कस कमी होत होता व त्यामुळे उत्पादन वर्ष दर वर्षी कमी होत होते परंतु उत्पादन खर्चात वाढ होत होती आणि उत्पादनही त्या पटीत मिळत नव्हते. शेतीविषयक योग्य सल्ला मिळत नव्हता. त्यामुळे श्री. मोरे यांचा सुद्धा खर्चाचा व उत्पादनाचा ताळमेळ बसत नव्हता. आणि एवढी शेती असून सुद्धा अपेक्षित उत्पन्न होत नव्हते. नवीन तंत्रज्ञानाची तसेच बाजारातील तयार खते वापरण्या पेक्षा जमिनीची आवश्यकता ओळखून खत कशापद्धतीने टाकावी याची माहिती शेतात काम करताना मिळत नव्हती. मशागत केली तरी ही जमीन ही घट्ट येत होती. मागील वर्षी पेक्षा उसाचे उत्पादन कमी मिळत होते. उस शेती करताना उत्पन्न दर वर्षी कमी कमी होत होते त्यामुळे दुसर्‍या पिकाची माहिती हवी होती , तसेच उस पिकावरील कीड व रोगाविषयी माहिती नव्हती त्यामुळे कीटकनाशक व औषधावरती खर्च जास्त होत होता व उत्पादन कमी मिळत होते. . नवीन तंत्रज्ञान विषयी , दर्जेदार बियाणाची निवड , लागणीची शास्त्रोक्त पद्धती पिकासाठी शिफारस केलेली योग्य खताची माहिती न मिळणे त्यामुळे उत्पादन खर्च वाढायचा व अपेक्षित उत्पादन मिळत नव्हते.
रिलायन्स फौंडेशनच्या संपर्कात मी ध्वनी संदेश या सेवेच्या माध्यमातून आलो माझ्या मित्रांनी माझा मोबाईल क्रमांक रिलायन्स फौंदेशन मध्ये दिला होता तसे गेली ३ ते ४ वर्षे फोन येतात मला तसेच मी 2020 मध्ये उस पिकासंदर्भात माहिती मिळवण्यासाठी ध्वनी संदेशमधील १८००४१९८८०० या क्रमांकाची माहिती मिळाली व त्यानंतर आवश्यकतेनुसार मी माहिती मिळवली.
रिलायन्स फौंडेशनची हेल्पलाइन या सेवेचा मी लाभार्थी आहे तसेच यामध्ये हवामानाचा अंदाज, रोग व कीड विषयी माहिती तसेच त्याच्यावरती प्रतीबंधानात्मक उपाय , हगामानुसार बियाणाची निवड , उत्पादन क्षमता , रासायनिक व सेंद्रिय शेतीचे माहिती,तसेच तन नियंत्रणासाठी उपाय योजना तसेच कीटक नाशक आणि तन नाशकाची कोणते व किती प्रमाणात द्यावे याचीही महिती देते.
रिलायन्स फौंडेशन कडून दिल्या जाणार्‍या शेती विषयक माहितीचा वापर मी माझ्या शेतात वेळोवेळी करून घेतला आहे या माहितीचा आधारेच मी माझ्या शेतीत खताचा बियाणाचा व फवारणी औषधांच्या वापर करीत असतो.
२०२० पासून व्हाईस मसेज आणि टोल फ्री १८०० ४१९ ८८०० या क्रमांकावरून फोन करून पीक व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन याविषयी माहिती मिळवत आहे. तसेच २०२१-२०२२ साली ऊस लागवड केली व पिकासाठी अवश्यक असणाऱ्या रासायनिक खत हे नत्र, स्फुरद, पालश,या घटकामध्ये कशा पद्धतीने दिले पाहिजे याची माहिती मिळवली. खते जमिनीवर खत पेरणी अवजाराच्या साह्याने द्यावी युरिया खत देताना निंबोळी पेंडीबरोबर ६ – १ या प्रमाणात मिसळून द्यावीत ऊस लागणीअगोदर बेणेप्रक्रिया – एक लिटर ऍसिटोबॅक्‍टर डायझोट्रॉफिक्‍स हे जिवाणू खत प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून त्यामध्ये बेणे १० मिनिटे बुडवून ठेवावे किंवा लागणीनंतर ६० दिवसांनी उसाच्या पानांवर फवारणी केल्यास शिफारशीत नत्र खतमात्रेत ५० टक्के बचत होते. एकरी २४ किलो गंधकाचा वापर केला असता स्फुरद आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचीही उपलब्धता वाढते याविषयी माहिती मिळाली. ऊसाच्या खोडव्याला पहिला डोज मध्ये एकरी एक बॅग युरिया अधिक दोन बॅग SSP (दानेदार) अधिक एक बॅग Potash मिसळून द्या. तसेच हवामानाचा अंदाज टोल फ्री क्रमांकावरून माहिती वेळोवेळी मिळवली. रिलायन्स फौन्डेशनच्या टोल फ्री १८०० ४१९ ८८०० या नंबरचा योग्यवेळी फोन करून माहिती त्यांना वेळोवेळी मिळाली. तसेच इतर शेतकर्यांनाही या टोल फ्री क्रमांकावरून मिळणारी माहिती सांगत होते. तज्ञांकडून मिळणार्या या शेतीविषयक माहितीचा वापर शेतात त्यांनी वेळो वेळी करून घेतला आहे. या माहितीच्या आधारेच श्री. विनायक मारुती मोरे यांनी शेतात युरिया, स्फुरद आणि म्युरेट ऑफ पोटॅश, तसेच ८६०३२ या बियाणाचा वापर केला व करपा व तांबेरा या रोगासाठी बाव्सिस्टीन मेंकोझेब आणि हुमणी या नियंत्रणासाठी मेटाराइझम जैविक बुरशी औषधांचा वापर केला. योग्यवेळी १९:१९:१९ व सूक्ष्म अन्नद्रव्य यांची योग्य फवारण्या तसेच खताचे योग्य डोस याविषयी चांगली माहिती त्यांना मिळाली. त्यामुळे त्यांचा उत्पादन खर्च जवळ जवळ २०% टक्क्यांनी कमी झाला आहे असे श्री. विनायक मारुती मोरे सांगतात
श्री. मोरे यांनी गेल्यावर्षी २ एकर मध्ये उस लागवड केली होती. त्यांनी उस पिकासाठी टोल फ्री क्रमांकावरून आणि व्हाईस मसेज सेवा यामाध्यमातून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे सपूर्ण नियोजन केले होते. श्री. मोरे यांना उस पिकच्या उत्पादनाचा खर्च २ एकर मध्ये ८०,००० रुपये आला. मागील वर्षी ९०,००० रुपये आला होता याच्या तुलनेत हा खर्च खूपच कमी आहे असे ते सांगतात. पूर्वीचे उस पिकाचे उत्पन्न फार कमी होत होते. श्री. मोरे यांना यावर्षीचे उसाचे उत्पन्न जवळ जवळ १० टनाने वाढले आहे. त्यांना उस 3000 रुपये टन असा भाव मिळाला. त्यांना उस पिकातून एकूण २,४०,००० रुपये एवढे उत्पन्न मिळाले. यासाठी त्यांना ९०,००० (यामध्ये मशागत, रासायनिक खत तननियंत्रण , पाणी व्यवस्थापन )रुपये एकूण खर्च आला आहे. आणि खर्च वजा जाता त्यांना २ एकर क्षेत्रामधून १,५०,००० रूपयांचा निव्वळ नफा मिळाला आहे. रिलायन्स फाउंडेशन कडून मिळणार्यार महितीमुळे त्यांचा उत्पादनात जवळ जवळ १० टनाने वाढ झाली आहे असे विनायक मारुती मोरे सांगतात.
​श्री. मोरे ह्यांची पुढची वाटचाल म्हणजे गेल्यावर्षायच्या भरघोस उत्पादनाने त्यांनी त्यांच्या कुटुंबासाठी नवीन घर बांधकाम चालू केले. आदि ते कच्चा घर म्हणजे वीट-मातीच्या घरात राहत होते, ह्या वर्षी त्याने नवीन सीमेंट चे घर बांधण्यास सुरुवात केली व बांधकाम चालू आहे, हे त्यांच्या आयुष्यात मोठी कामगिरी आहे कारण आता ते त्यांच्या पत्नी, मुले व आई-बाबा एका पक्क्या सोयिस्कर बांधकामाच्या घरात राहणार. रिलायन्स फौडेशनकडून दिल्या सेवा ह्या शेतकऱ्यांना अगदी मोफत आहेत. यासाठी सुद्धा त्यांना चांगले मार्गदर्शन मिळाले व त्यामधून सुद्धा त्यांना चांगले उत्पन्न मिळाले असे ते सांगतात.तसेच कमी खर्चात उत्पादन चांगले व्हावे व त्यांचे जीवनमान सुधारावे अश्याच हेतूने रिलायन्स फाउंडेशन शेतकर्यांनसाठी काम करत आहे. शेती करत असताना त्याविषयीची माहिती कुणाला विचारावी हाच प्रश्न शेतकऱ्यांना असतो त्यामुळे रिलायन्स फौंडेशनच्या १८०० ४१९ ८८०० या टोल फ्री क्रमांकाचा वापर करून शेतरी माहिती मिळवू शकतो असे श्री.मोरे सांगतात. यासाठी रिलायन्स फाउंडेशनला ते धन्यवाद देत आहेत.

विनायक मारुती मोरे
रा. रेठरे हरणाक्ष , ता.वाळवा , जि. सांगली .मो. न. 9422380729
एकूण शेती :- २ एकर उस शेती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.