Homeकोंकण - ठाणेआजरा नगरपंचायतला होणार पाच वर्षे पूर्ण. - नगरपंचायत वतीने पाचवा वर्धापन दिन...

आजरा नगरपंचायतला होणार पाच वर्षे पूर्ण. – नगरपंचायत वतीने पाचवा वर्धापन दिन साजरा होणार मोठ्या उत्साहात.( तीन वर्षांमध्ये १५ कोटीची कामे तर प्रस्थापित ४० कोटी कामे होणार आहेत. )

आजरा नगरपंचायतला होणार पाच वर्षे पूर्ण. – नगरपंचायत वतीने पाचवा वर्धापन दिन साजरा होणार मोठ्या उत्साहात.
( तीन वर्षांमध्ये १५ कोटीची कामे तर प्रस्थापित ४० कोटी कामे होणार आहेत. )

आजरा. – प्रतिनिधी.

आजरा नगरपंचायतला मंगळावर दि १३ रोजी पाच वर्षे पूर्ण होणार असून नगरपंचायत वतीने पाचवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. १३ / ९ /२०१७ रोजी महाराष्ट्र नगर विकासकडून नगरपंचायत म्हणून मान्यता मिळाली. आजरा शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार व विकासाच्या दृष्टीने नगरपंचायतने पहिल्या पाच वर्षात आजरा शहराचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये नगरपंचायत चे सर्व नगरसेवक यांचं चांगलं सहकार्य लाभलं. आजरा नगरपंचायत वतीने होत असलेला पाचवा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यासाठी पत्रकार परिषदेत माहिती दिली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी होत्या नगरसेवक विलास नाईक यांनी स्वागत व प्रास्ताविक करताना म्हणाले आजरा नगरपंचायत आणण्यासाठी नगरसेवक अशोक चराटी त्यांच्या माध्यमातून मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्यामुळे व त्यांनी मदत केल्यामुळे आजरा नगरपंचायतला मान्यता मिळाली या माध्यमातून आजरा शहराचा विकास करण्याच्या दृष्टीने वाटचाल चालू होती. परंतु पहिल्या वर्षात अतिवृष्टीचं संकट आलं यानंतर पुढील दोन वर्षात कोरोनाचा संकट आले. यानंतर वेगवेगळे फंड येऊ लागले पुढील येणाऱ्या पाच वर्षात चांगला निधी मिळणार आहे. आजरा शहरातील नळ पाणी चांगल्या दर्जाची होणार आहे. असे नगरसेवक विलास नाईक म्हणाले. यावेळी विकास कामाबाबत माहिती देताना नगरसेवक बांधकाम विभाग सभापती किरण कांबळे म्हणाले
मागील तीन वर्षांमध्ये १५ कोटीची कामे झाली व प्रस्थापित ४० कोटी कामे होणार आहेत. या विकास कामाच्या निधीसाठी सर्व नेते मंडळींचे सहकार्य मिळाले. यामध्ये मंत्री सतेज पाटील यांच्याकडून अग्निशामक, रुग्णवाहिका फ्राय ब्रिगेड दोन बुलेट तसेच इतर निधी यामध्ये पथदिवे १० लाख स्वच्छ संरक्षेण ३ कोटी, छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती परिसरात सुशोभीकरणासाठी १० लाख, तसेच आजरा नगरपंचायतचा माझी वसुंधरा महाअभियानात राज्यात आठवा क्रमांक, येणाऱ्या काळात राज्यात पहिल्या पाच मध्ये आजरा नगरपंचायत असेल येणाऱ्या काळात आजरा नगरपंचायतचा विकास कामातून काय पार्टी होणार आहे या उत्साहात आजरा नगरपंचायतचा पाचवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून या वर्धापन दिनासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे नगरसेवक श्री कांबळे यांनी आवाहन केले यावेळी नगरसेवक अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी, संभाजी पाटील, नगरसेविका सौ. अस्मिता जाधव, यासाराबीन लामतुरे, सौ. शंकुतला सलावाडे सह नगरसेवक उपस्थित होते आभार मुख्याधिकारी अजिंक्य पाटील यांनी मांनले
.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.