आजरा नगरपंचायतचा पाचवा वर्धापन दिन उत्साहात साजरा.
( तीन वर्षांमध्ये १५ कोटीची कामे तर प्रस्थापित ४० कोटी कामे होणार. )
आजरा. – प्रतिनिधी.

आजरा नगरपंचायतला मंगळावर दि १३ रोजी पाच वर्षे पुर्ण झाली. आजरा नगरपंचायत वतीने पाचवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी केक कापुन आनंदउत्सव साजरा केला. यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. १३ / ९ /२०१७ रोजी महाराष्ट्र नगर विकासकडून नगरपंचायत म्हणून मान्यता मिळाली. आजरा शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार व विकासाच्या दृष्टीने नगरपंचायतने पहिल्या पाच वर्षात आजरा शहराचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये नगरपंचायतचे सर्व नगरसेवक यांच्या सहकार्याने विकासासाठी प्रयत्न झाले. आजरा नगरपंचायत होण्यासाठी नगरसेवक अशोक चराटी त्यांच्या माध्यमातून मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्यामुळे व त्यांनी मदत केल्यामुळे आजरा नगरपंचायतला मान्यता मिळाली या माध्यमातून आजरा शहराचा विकास करण्याच्या दृष्टीने वाटचाल चालू होती. परंतु पहिल्या वर्षात अतिवृष्टीचं संकट आलं यानंतर पुढील दोन वर्षात कोरोनाचा संकट आले. यानंतर वेगवेगळे फंड येऊ लागले पुढील येणाऱ्या पाच वर्षात चांगला निधी मिळणार आहे. आजरा शहरातील नळ पाणी चांगल्या दर्जाची होणार आहे. आजरा नगरपंचायत च्या माध्यमातून मागील तीन वर्षांमध्ये १५ कोटीची कामे झाली. व प्रस्थापित ४० कोटी कामे होणार आहेत. या विकास कामाच्या निधीसाठी सर्व नेते मंडळींचे सहकार्य मिळाले. यामध्ये मंत्री सतेज पाटील यांच्याकडून अग्निशामक, रुग्णवाहिका फ्राय ब्रिगेड दोन बुलेट तसेच इतर निधी यामध्ये पथदिवे १० लाख स्वच्छ संरक्षेण ३ कोटी, छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती परिसरात सुशोभीकरणासाठी १० लाख, तसेच आजरा नगरपंचायतचा माझी वसुंधरा महाअभियानात राज्यात आठवा क्रमांक, येणाऱ्या काळात राज्यात पहिल्या पाच मध्ये आजरा नगरपंचायत असेल येणाऱ्या काळात आजरा नगरपंचायतचा विकास कामातून कामे होणार आहेत. अशी माहिती वर्धापन दिनानिमित्त नगरसेवक यांनी दिली या वर्धापन दिनासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्षा ज्योस्त्ना चराटी, उपनगराध्यक्षा संजीवनी सावंत, नगरसेवक अशोक चराटी, विलास नाईक, संभाजी पाटील, अनिरुद्ध केसरकर, किरण कांबळे, शिंकदर दरवाजकर,आलम नाईकवाडे, किशोर पालपोलकर, अभिषेक शिंपी, आनंदा कुंभार, नगरसेविका सौ. अस्मिता जाधव, यासीराबी लामतुरे, यासमीन बुड्डेखान, सुरैय्या खेडेकर, सौ.शकुतला सलावाडे, शुंभदा जोशी, रेश्मा सोनेखान, सिमा पोवार, सह कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते. आभार मुख्याधिकारी अजिंक्य पाटील यांनी मांनले