Homeकोंकण - ठाणेखासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर १६ सप्टेंबरला सुनावणी ? ईडीला अर्जावर...

खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर १६ सप्टेंबरला सुनावणी ? ईडीला अर्जावर उत्तर दाखल करण्याचे आदेश१६ सप्टेंबर रोजीच संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होण्याची शक्यता.

खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर १६ सप्टेंबरला सुनावणी ? ईडीला अर्जावर उत्तर दाखल करण्याचे आदेश
१६ सप्टेंबर रोजीच संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होण्याची शक्यता.

मुंबई – प्रतिनिधी.

पत्राचाळ कथित घोटाळाप्रकरणी अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जामिनासाठी दाखल केलेल्या अर्जावर १६ सप्टेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश विशेष न्यायालयाने गुरुवारी अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) दिले. १६ सप्टेंबर रोजीच राऊत यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.
अंमलबजावणी संचालनालय (ईडी) तपास सुरू ठेवू शकते, परंतु आपल्याला तुरुंगात ठेवल्याने काहीही निष्पन्न होणार नाही, असा दावा करून राऊत यांनी बुधवारी विशेष न्यायालयात केला होता. राऊत यांच्या वकिलाने त्यांचा जामीन अर्ज गुरुवारी विशेष न्यायालयात सादर केला. तसेच त्यावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली. त्यानंतर न्यायालयाने ईडीला राऊत यांच्या जामीन अर्जावर १६ सप्टेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले.
राऊत यांना सोमवारीच विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. तेव्हा विशेष न्यायालयाने त्यांच्या न्यायालयीन कोठडीत १९ सप्टेंबरपर्यंत वाढ केली. बुधवारी राऊत यांनी जामिनासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला.पत्राचाळ कथित घोटाळाप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राऊत यांना अटक केली होती. त्यांना न्यायालयीने कोठडी सुनावल्याने राऊत हे सध्या आर्थर रोड मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.