Homeकोंकण - ठाणेअदानींच्या दोन प्रकल्पांसाठी 83,700 चौ.फूट वनजमीन मंजूर - अलिबागमध्ये सिमेंट टर्मिनल होणार.

अदानींच्या दोन प्रकल्पांसाठी 83,700 चौ.फूट वनजमीन मंजूर – अलिबागमध्ये सिमेंट टर्मिनल होणार.

अदानींच्या दोन प्रकल्पांसाठी 83,700 चौ.फूट वनजमीन मंजूर – अलिबागमध्ये सिमेंट टर्मिनल होणार.

अलिबाग – प्रतिनिधी.

राज्य सरकारने अदानी समूहाच्या दोन प्रकल्पांसाठी एकूण 83,700 चौरस फूट वनजमीन देण्यास मंजुरी दिली आहे. यात रायगड आणि अमरावती जिल्ह्यातील जमिनींचा समावेश आहे. वन विभागाने यासंदर्भातील दोन स्वतंत्र आदेश सोमवारी जारी केले.

अलिबागमध्ये काय होणार?

रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील शहापूर आणि शाहबाज येथील कांदळवनयुक्त सुमारे 69,933 चौरस फूट म्हणजेच 0.6497 हेक्टर जमीन अदानींच्या प्रस्तावित *सिमेंट बल्क टर्मिनल साठी देण्यात येणार आहे.

या जमिनीवर जहाजांसाठी बर्थिंग जेट्टी, कन्व्हेयर कॉरिडॉर, संपर्क रस्ता व संबंधित सुविधा उभारल्या जाणार आहेत. ही जमीन राखीव वन, नाला कांदळवन आणि खाडी कांदळवन क्षेत्रातील असल्याने वन विभागाची मंजुरी आवश्यक होती.

शासनाच्या अटी.-
जमीन देताना शासनाने काही अटी घातल्या आहेत. वन अधिकाऱ्यांना या क्षेत्रात अडथळ्याविना प्रवेश देणे कंपनीसाठी बंधनकारक राहील. कंपनीने प्रवेशावर निर्बंध आणल्यास किंवा कामात अडथळा निर्माण केल्यास वनजमीन बिगर-वन वापरासाठी दिलेली मंजुरी मागे घेतली जाऊ शकते.

दरम्यान भरपाईच्या स्वरूपातील वनीकरण किंवा अन्य अटींबाबत शासन निर्णयात सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.