Homeकोंकण - ठाणेनागरिकांना कचराकुंडीचे वाटप.- कचऱ्याचे वर्गीकरण करण्याचे.- मडिलगे सरपंच, सदस्य यांचे आवाहन.🟣समस्या अंतर्गत...

नागरिकांना कचराकुंडीचे वाटप.- कचऱ्याचे वर्गीकरण करण्याचे.- मडिलगे सरपंच, सदस्य यांचे आवाहन.🟣समस्या अंतर्गत रस्त्यांची.- कोवाडे – निगुडगे रस्त्याची दुरावस्था.- लोकप्रतिनिधी सह संबंधित विभागाचे दुर्लक्ष.

🟣नागरिकांना कचराकुंडीचे वाटप.- कचऱ्याचे वर्गीकरण करण्याचे.- मडिलगे सरपंच, सदस्य यांचे आवाहन.
🟣समस्या अंतर्गत रस्त्यांची.- कोवाडे – निगुडगे रस्त्याची दुरावस्था.- लोकप्रतिनिधी सह संबंधित विभागाचे दुर्लक्ष.

🟣नागरिकांना कचराकुंडीचे वाटप.- कचऱ्याचे वर्गीकरण करण्याचे मडिलगे , सरपंच, सदस्य यांचे आवाहन.

आजरा : प्रतिनिधी.

ग्रामपंचायत मडिलगे, ता. आजरा, जि. कोल्हापूर यांच्या वतीने घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छता अभियानांतर्गत नागरिकांना कचराकुंडीचे वाटप १५ ऑगस्ट भारतीय स्वतंत्र दिनाचे अवचित साधून सरपंच बापू निऊगरे व उप सरपंच मनीषा काणेकर तसेच ग्रामपंचायत सदस्य व माजी सरपंच गावातील ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते कचराकुंडीचे प्राथमिक स्वरूपात वाटप करण्यात आले.
घरातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे योग्य पद्धतीने वर्गीकरण करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन संरपंच श्री निऊगरे व ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे
.

ओला कचरा, सुका कचरा, सॅनिटरी कचरा आणि विशेष काळजीचा कचरा अशा चार प्रकारांत कचऱ्याचे वर्गीकरण करणे आवश्यक असल्याचे पोस्टरद्वारे सांगण्यात आले आहे. घरातील कचरा वेगवेगळा करून ग्रामपंचायतीच्या कचरा संकलन व्यवस्थेकडे देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. “स्वच्छ गाव – सुंदर गाव – निरोगी गाव” या संकल्पनेतून नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून गाव स्वच्छ, सुंदर आणि हरित ठेवण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन ग्रामपंचायत मडिलगे यांनी केले आहे. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

🟣समस्या अंतर्गत रस्त्यांची.- कोवाडे – निगुडगे रस्त्याची दुरावस्था.- लोकप्रतिनिधी सह संबंधित विभागाचे दुर्लक्ष.

आजरा.- प्रतिनिधी.

कोवाडे – गडहिंग्लज रस्त्यावर कोवाडे बस स्टँडजवळ व निगुडगे कडे जाणाऱ्या रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे व या खड्ड्यामध्ये साचलेल्या पाण्यामुळे फक्त रस्त्याची दुरावस्था नाही. तर आरोग्याच्या दृष्टीने व अपघात निमंत्रणा सारखे
रस्त्याला चिखलाचे स्वरूप आले आहे. या दुरवस्थेमुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून ग्रामस्थांना दैनंदिन ये-जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. संबंधित विभागाने, व देखभाल दुरुस्तीची मर्यादा, कालावधी असल्यास याकडे संबंधित ठेकेदाराने गांभीर्याने लक्ष देऊन पावसाळा संपेपर्यंत किमान मुरूम टाकून खड्डे बुजवावेत व प्रत्यक्ष पाहणी करून डांबरीकरणासाठी लोकप्रतिनिधी लक्ष घालावे अशी मागणी ग्रामस्थ व वाहनधारकांमधून होत आहे.

कोवाडे व निंगुडगे दरम्यान कोवाडे स्टँडपासून काही अंतरापर्यंत रस्त्याची अत्यंत वाईट स्थिती झाली आहे. खड्ड्यांमध्ये गाड्या अडकून पडल्याने वाहनांचे मोठे नुकसान होत आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेचा आणि वेळेचा अपव्यय थांबवण्यासाठी या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची गरज व्यक्त होत आहे.
हा रस्ता हाजगोळी, पेद्रेवाडी, सरोळी, ऐनापूर आणि आजरा या प्रमुख ठिकाणांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. दररोज या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते. रस्ता चिखलमय झाल्यामुळे अपघातांचा धोका वाढला असून वाहनचालकांना कसरत करत गाड्या चालवाव्या लागत आहेत.
पावसाळा संपेपर्यंत खड्ड्यांमध्ये त्वरित मुरूम भरून रस्ता वाहतुकीयोग्य करावा. पावसाळा संपल्यानंतर संपूर्ण रस्त्याचे योग्य दर्जाचे डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.