Homeकोंकण - ठाणेव्यंकटराव हायस्कूलच्या प्रशांत गुरवसर यांच्या. - विज्ञान शैक्षणिक साधनास द्वितीय क्रमांक. -...

व्यंकटराव हायस्कूलच्या प्रशांत गुरवसर यांच्या. – विज्ञान शैक्षणिक साधनास द्वितीय क्रमांक. – सर्वत्र कौतुक.

व्यंकटराव हायस्कूलच्या प्रशांत गुरवसर यांच्या. – विज्ञान शैक्षणिक साधनास द्वितीय क्रमांक. – सर्वत्र कौतुक.

आजरा. – प्रतिनिधी.

आजरा येथील व्यंकटराव हायस्कूलचे प्रशांत गुरव सर यांच्या विज्ञान शैक्षणिक साधनास द्वितीय क्रमांक मिळाला. भैरवनाथ हायस्कूल बहिरेवाडी यांचे सयुक्त विद्यमाने आयोजित ४९ वे आजरा ता. विज्ञान प्रदर्शन २०२१-२०२२ डॉ. जे. पी. नाईक स्मारक बहिरेवाडी या ठिकाणी नुकतेच संपन्न झाले. या विज्ञान परिषद प्रदर्शनामध्ये व्यंकटराव हायस्कूलचे सहा. शिक्षक प्रशांत गुरव यांनी अध्यापक निर्मिती शैक्षणिक साहित्य (माध्यमिक शिक्षक ) गटामध्ये व्दितीय क्रमांक मिळवला.
मानवी शरीर व इंद्रिय संस्था हे साधन यांनी पचनसंस्था श्वसनसंस्था रक्ताभिसरण संस्था प्रजनन संस्था, आस्थिसंस्था, स्नायुसंस्था, पाठीचा कणा, लहान मेंदू, मोठा मेंदू, अशा अनेक कार्यरत असणाऱ्या इंद्रिय संस्थाविषयी माहिती चित्ररूपाने एका दृष्टीक्षेपात मांडण्यात आली. प्रत्येक संस्थेतील आंतरेंद्रीय त्यांचे कार्य त्यामध्ये बिघाड झाल्यास होणारी विकास किंवा आजार, रोग होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी याविषयी अतिशय सोप्या भाषेत माहितीचे स्पष्टीकरण करण्यात आले टाकाऊ पदार्थापासून टिकाऊ साहित्य तयार करण्यात आलेले अल्पकाचीक असे शैक्षणिक साहित्य आहे विद्यार्थी शिक्षक व पालक यांना हाताळण्यास अतिशय सोपे हे शैक्षणिक साहित्य असून पर्यावरणात स्नेही व पर्यावरण पूरक साहित्याचे सर्वत्र वक्तृत्व अभिनंदन होत आहे. आजरा महाल शिक्षण मंडळ आग्रहाचे अध्यक्ष जयंवतराव शिंपी सर्व संचालक यांचे प्रोत्साहन मिळाले प्राचार्य. एस. जी खोराटे व पर्यवेक्षक एस. एन पाटील यांचे मार्गदर्शन लाभले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.