Homeकोंकण - ठाणेभारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा होणार! -१५ ऑगस्ट रोजी देशभरात विविध कार्यक्रमांचे...

भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा होणार! -१५ ऑगस्ट रोजी देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन. ध्वजारोहणासह देशभक्तीपर उपक्रम.🌨️राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता.- कोकण-घाटमाथ्यासह अनेक भागांना मुसळधार पावसाचा इशा

🇮🇪भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा होणार! –
१५ ऑगस्ट रोजी देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन. ध्वजारोहणासह देशभक्तीपर उपक्रम.
🌨️राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता.- कोकण-घाटमाथ्यासह अनेक भागांना मुसळधार पावसाचा इशारा.

🇮🇪भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा होणार! –
१५ ऑगस्ट रोजी देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन. ध्वजारोहणासह देशभक्तीपर उपक्रम.

मुंबई.- प्रतिनिधी.

८० वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा होणार आहे देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते
१५ ऑगस्ट हा प्रत्येक भारतीयाच्या मनात अभिमान आणि देशभक्तीची भावना जागवणारा राष्ट्रीय दिवस आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताने ब्रिटिश राजवटीतून स्वातंत्र्य मिळवले. या स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधींसह असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी प्रदीर्घ संघर्ष केला आणि अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.

स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात ध्वजारोहण, राष्ट्रगीत, प्रभातफेरी, सांस्कृतिक कार्यक्रम, देशभक्तीपर गीतांचे आयोजन तसेच स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन केले जाते. दिल्लीतील लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्राला संबोधन केले जाते.


८० वा स्वातंत्र्य दिन विशेष का?
२०२६ मध्ये स्वातंत्र्य दिनाचा ८० वा सोहळा होत आहे. हा टप्पा केवळ स्वातंत्र्याच्या इतिहासाची आठवण करून देणारा नसून, देशाच्या विकासात प्रत्येक नागरिकाची जबाबदारी अधोरेखित करणारा आहे. स्वातंत्र्याची जपणूक, संविधानिक मूल्यांचा सन्मान, सामाजिक एकोपा आणि विकसित भारताच्या निर्मितीसाठी योगदान देण्याचा संकल्प या दिवशी केला जातो.
“स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या वीरांना सलाम,राष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकजुटीने पुढे जाऊया!” सर्व भारतीय नागरिकांना भारतीय स्वतंत्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

🌨️राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता.- कोकण-घाटमाथ्यासह अनेक भागांना मुसळधार पावसाचा इशारा.

मुंबई : – प्रतिनिधी

राज्यात श्रावण सरींचा जोर कायम असून, कोकण आणि घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. विदर्भातील काही भागांतही विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज असून संबंधित भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच कोकणातील काही भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावरही जोरदार सरींचा अंदाज आहे. पुणे घाटमाथ्यासाठी अतिमुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे ऑरेंज अलर्ट देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, बंगालच्या उपसागरातील हवामानातील बदल आणि अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्यात पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत विविध भागांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.

घाट परिसरातून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, तसेच हवामान विभाग व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.