Homeकोंकण - ठाणेडॉ. रियाज शमनजींचा वाढदिवसानिमित्त होणार गौरव. - छत्रपती शाहू महाराज प्रमुख उपस्थिती....

डॉ. रियाज शमनजींचा वाढदिवसानिमित्त होणार गौरव. – छत्रपती शाहू महाराज प्रमुख उपस्थिती. – गौरव समीतीची माहिती.

डॉ. रियाज शमनजींचा वाढदिवसानिमित्त होणार गौरव. – छत्रपती शाहू महाराज प्रमुख उपस्थिती. – गौरव समीतीची माहिती.

गडहिंग्लज. – प्रतिनिधी.

शमनजी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष डॉ. रियाज शमनजीजी यांचा वाढदिवसा निमित्त रियास शमनजी वाढदिवस गौरव समितीतर्फे त्यांचा छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते रविवार दुपारी ४ वा. नागरिक सत्कार आयोजित केला आहे. संकेश्वर रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात हा कार्यक्रम परिस्थितीतील नेसरी व गडहिंग्लज ग्रामीण भागात कृषी नर्सिंग फार्मसी महाविद्यालय उभारले आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या कार्याचा गौरव व या कार्यक्रमात केला जाणार आहे. सच्चा शिवसैनिक म्हणून त्यांची गडहिंग्लज व परिसरात राजकीय क्षेत्रात आपला ठसा उमटला आहे. वाढदिवसानिमित्त शैक्षणिक सामाजिक क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा उजाळा देण्यात येणार आहे या गौरव समितीच्या वतीने घेण्यात येणाऱ्या या कार्यक्रमासाठी माजी आमदार संजय घाटगे , मुंबई महानगरपालिकेचे सुधार समितीचे अध्यक्ष सदा परब, शिवसेनेचे उपनेते अरुन दुधवाडकर, जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार, यांची प्रमुख उपस्थित राहणार आहे. गौरव समितीचे अध्यक्ष लक्ष्मण कंग्राळकर सचिव सुलोचना रेडकर सदस्य मुरलीधर माळी मुफासीरा बारगीर, ओमप्रकाश जाधव, आशिष कुंभार यांच्यासह शमनजी ग्रुप मधील कर्मचारी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. अशी माहिती वाढदिवस गौरव समितीने दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.