श्रीचा उत्सव हा मांगल्याचा उत्सव विसर्जन शांततेत आनंदात डॉल्बीमुक्त करा. – उप. विभागीय पो. अधिकारी राजीव नवले. ( गडहिंग्लज विभाग. )
आजरा प्रतिनिधी.

श्रीचा उत्सव हा मांगल्याचा उत्सव विसर्जन शांततेत, आनंदात, व डॉल्बीमुक्त करावे असे आजरा येथील गणेश विसर्जन शांतता बैठकीत उप. विभागीय पो. अधिकारी राजीव नवले. ( गडहिंग्लज विभाग. ) बोलत होते.
श्री नवले म्हणाले मंडळाने ध्वनी प्रदूषण करून आवाजाची पातळी ओलांडू नये आवाजाची व वेळेची मर्यादा प्रत्येक मंडळांनी जपली पाहिजेत या उत्सवामध्ये सर्व जाती धर्माचे लोक सहभागी असतात हा उत्सव आनंदाने साजरा केला जातो. त्याचे विसर्जन देखील आनंदाने करूया कायदा सुव्यवस्था मंडळाने बिघडू नये नकळत काही घटना घडतात याची दक्षता घ्यावी. असे कोणते कृत्य होऊ नये यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडेल कायद्याचे पालन न करणारे काही उत्साही कार्यकर्ते असतात अशा कार्यकर्त्यांना मंडळाचे अध्यक्षांनी सूचना द्याव्यात. पोलिसांना सहकार्य करा प्रशासन तुमच्या मदतीसाठी आहे. सर्व गणेश मंडळांनी पारंपारिक वाद्यात गणेश विसर्जन करावे. व डॉल्बीमुक्त गणेश विसर्जन करून अखंडपणे परंपरा जपावी असे मार्गदर्शन व सूचना गडहिंग्लज विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नवले यांनी गणेश मंडळांना दिल्या. यावेळी तहसीलदार विकास अहिर म्हणाले गणेश विसर्जना बाबत शहरातील गणेश मंडळाच्या काही सूचना असतील याबाबत चर्चा करण्यासाठी सदरची बैठक असून आपण कोणत्या सूचना असतील त्या मांडाव्यात त्याचे निरसन करण्यात येईल सदरची बैठकी गणेश विसर्जन शांततेत व आनंदात व्हावे. यासाठी ही बैठक असल्याचे तहसीलदार श्री अहिर यांनी सांगितले. आजऱ्याचे सपोनि सुनिल हारुगडे शांततेत गणेश विसर्जन करावे वेळेची मर्यादा व प्रशासनाने दिलेल्या सूचनेचे पालन करावे प्रशासन तुमच्या मदतीसाठीच आहे. कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही. याची दक्षता घ्यावी. अशा सूचना दिल्या. या बैठकीला महावितरण, नगरपंचायत, एस.टी. महामंडळ विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मंडळाचे पदाधिकारी यांनी गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत वाटेत येणारे अडथळे लाईट्स, रस्त्यातील खड्डे अशा सूचना केल्या यामध्ये भैय्या टोपले, बाळू इंगळे सह गणेश अध्यक्षांनी सहभाग घेतला होता. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचना गणेश विसर्जन मिरवणुकीत कोणतीही अडथळे येणार नाहीत याची दक्षता घेतली जाईल असे सांगितले. यावेळी शांतता बैठकीला सचिन इंदुलकर, पंचायत समिती माजी सदस्य बशीर खेडेकर, अमित खेडेकर, उमेश पालपोकर, महेश पाटील, अजित हरेर सह, आजरा शहरातील मंडळाचे अध्यक्ष कार्यकर्ते उपस्थित होते.

{ आजरा शहरातील गणेश विसर्जन शांतता बैठकीला आजरा नगरपंचायतचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष नगरसेवक यांची पाठ }
