लग्नाची – वरात… पडली महागात.- आजरा शेळप मध्ये पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल.
आजरा.प्रतिनिधी.
आजरा तालुक्यातील शेळप येथे कायद्याचे उल्लंघन करत लग्नकार्यात अधिक संख्येने सहभागी झाल्याने शेळप येथील ५ जना विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यामध्ये शशिकांत कृष्णा नवार, माधुरी शशिकांत नवार निवृत्ती तातोबा पाटील, वैभव निवृत्ती पाटील विजय अशोक कांबळे,रा. शेळप तालुका आजरा यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार बंदी आदेश असताना, तसेच २५ नागरिकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा असताना ९० ते १०० नागरिक घेऊन लग्न सोहळा करण्यात आला. तसेच लग्नाच्या वरातीत १०० ते १२० नागरिकांच्या उपस्थितीत वरात काढण्यात आली व वेळेचे उल्लंघन केल्यामुळे आजरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर फिर्याद पोलीस पाटील शांताराम पाटील.यांनी दिली आहे. अधिक तपास पोलीस करत आहे.