Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रकर्नाटकात उद्यापासून २७ एप्रिल पासून १४ दिवसांचा लॉकडाऊन महाराष्ट्रात लादलेले कडक निर्बंधही...

कर्नाटकात उद्यापासून २७ एप्रिल पासून १४ दिवसांचा लॉकडाऊन महाराष्ट्रात लादलेले कडक निर्बंधही तसेच कॉपी केले.

कर्नाटकात उद्यापासून २७ एप्रिल पासून १४ दिवसांचा लॉकडाऊन
महाराष्ट्रात लादलेले कडक निर्बंधही तसेच कॉपी केले

बंगळुरू, प्रतिनिधी.२६:- 

देशात कोरोनाची दुसरी लाट दिवसेंदिवस घातक होत चालली आहे. देशात सलग दुसऱ्या दिवशी रविवारी 3.5 लाख नवे कोरोना रुग्ण आढळले. सुदैवाने बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठी म्हणजे 2.14 लाख असून यासोबतच देशात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या 1.42 कोटी झाली आहे. महाराष्ट्रात रविवारी 66,161 नवे रुग्ण आढळले तर 61,450 बरे झाले. छत्तीसगडमध्ये 12,666 नवे रुग्ण आढळले तर 11,065 कोरोनामुक्त झाले. देशामध्ये ऍक्टिव्ह केस म्हणजे उपचार सुरु असलेल्या रुग्णांच्या संख्या 28 लाखांच्या पुढे गेली आहे. सध्या देशात 28 लाख 7 हजार 333 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

दरम्यान, काही राज्यांनी कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. तर काही राज्यांनी कडक निर्बंध लादले आहेत. मात्र महाराष्ट्राने केलेल्या लॉकडाऊन घोषणेप्रमाणे अगदी तसेच कडक निर्बध कर्नाटकाने कॉपी केल्याचं पाहायला मिळतंय. कारण आरोग्य यंत्रणेवरील ताण दूर करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. आता कर्नाटक सरकारनेही लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. उद्यापासून २७ एप्रिल पासून १४ दिवसांचा लॉकडाऊन राज्यात असणार आहे. उद्या रात्रीपासून निर्बंध लागू होणार आहेत.

अत्यावश्यक सेवांना या लॉकडाऊनमधून सूट देण्यात आली आहे. दुकानं सकाळी ६ ते सकाळी १० पर्यंत अर्थात ४ तास सुरु असतील. त्यानंतर दुकानं बंद असतील असं जाहीर करण्यात आलं आहे. त्या व्यतिरिक्त इतर सेवा पूर्णपणे बंद असतील असं सांगण्यात आलं आहे. तर बांधकाम, शेती आणि उत्पादन क्षेत्राला परवानगी असणार आहे. सार्वजनिक वाहतूक बंद असणार आहे. त्याचबरोबर राज्य आणि राज्याबाहेर यात्रा करण्याची परवानगी नसेल. अत्यावश्यक प्रकरणात सूट दिली जाईल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. त्याचबरोबर दारुच्या होम डिलिव्हरीलाही मंजुरी देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.