Homeकोंकण - ठाणेसामाजिक कार्यकर्ते मंगेश तानवडे यांनी सामाजिक उपक्रमातून साजरा केला वाढदिवस.

सामाजिक कार्यकर्ते मंगेश तानवडे यांनी सामाजिक उपक्रमातून साजरा केला वाढदिवस.

सामाजिक कार्यकर्ते मंगेश तानवडे यांनी सामाजिक उपक्रमातून साजरा केला वाढदिवस.

भुदरगड. – प्रतिनिधी.

भुदरगड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते मंगेश तानवडे यांनी रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर व शालेय साहित्य वाटपातून ३ सप्टेंबर रोजी आपला वाढदिवस साजरा केला. असे उपक्रम राबवत तरुनांपुढे एक आदर्श निर्माण केला. गावातील आणि भुदरगड तालुक्यातील युवकांनी रक्तदान केले. महिला व पुरुष यांचे आरोग्य शिबिरात HB तपासण्यात आला. विद्यामंदीर नागंरगाव वाडी आणि नांगरगाव शाळेतील मुलांना इंग्लिश, गणित व मराठीच्या वह्या वाटप राधानगरी भुदरगड आजरा मतदारसंघाचे युवा नेते राहुल देसाई यांच्या हस्ते वाटप करण्यात आल्या. अंगणवाडीतील मुलांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले. श्री.तानवडे यांच्याकडून दरवर्षी आपल्या गावात व गावाबाहेर समाजातील गरजू व्यक्तींना जीवनोयोगी साहित्य वाटप करतात आपण समाजाप्रती देणं लागतो या भावनेतून त्यांच्याकडून सतत अशा उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्यांचा आदर्श समाजाने घ्यावा असे राहूल देसाई बोलताना म्हणाले. सदर यावेळी गारगोटी भाजपा शहर प्रमुख प्रकाश वास्कर, बाळ हळदकर सर, डॉ. उत्तम तानवडे यांनी मनोगते व्यक्त केली. अशोक तानवडे, सुनील तानवडे, बाळासो तानवडे, आबासो तानवडे शाळेतील विद्यार्थी, तरुण युवक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.