Homeकोंकण - ठाणेसमाजाच्या विकासा करिता वकिलीचा उपयोग करणार. - अॅ. मनोहर बुगडे

समाजाच्या विकासा करिता वकिलीचा उपयोग करणार. – अॅ. मनोहर बुगडे

समाजाच्या विकासा करिता वकिलीचा उपयोग करणार. – अॅ. मनोहर बुगडे

आजरा. – प्रतिनिधी.

मुंबई युनिव्हर्सिटी मध्ये नोकरी करीत वयाच्या पंच्चावंनाव्या वर्षी एल एल बी कोर्स फस्टक्लासने उतीर्न झालो असलो तरी माझी ही वकीली समाजाच्या विकासासाठी वापरणार असलेच मत अॅ. मनोहर बुगडे यांनी सत्कारला उतर देताना व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मारूती ईक्के होते . प्रास्ताविक करताना अशोक शिंदे म्हणाले मनोहर बुगडे व चंद्रकांत निकम वकील ही पदवी यशस्वी पार केले बदल मलिग्रे ग्रामस्थ, मित्र परीवार व मलिग्रे सार्वजनिक वाचनालय वतीने अभिनंदन व सत्कार करण्यात आला.
बुगडे यांनी पुढे बोलताना म्हणाले आम्ही ग्रामिण भागात शेतकरी कष्टकरी कुंटूबात राहून अभ्यास केला. सतत परिश्रमांतून आपल्या आवडीनुसार क्षेत्रात प्रगती करता येते. यावेळी वकील चंद्रकांत निकम यांनी मानवी अधिकार आणी सहकारी कायद्या या विषयांवर विशेष लक्ष दिले असून एल एल बी कोर्स इंग्लिश ऐवजी मराठी माध्यमातून सर्व सामान्य विद्यार्थ्यांना घेता यावे यासाठी चे प्रयत्न तसेच कोल्हापूर कागल गडहिंग्लज चंदगड बेळगाव रेल्वे सेवा सुरू होणेसाठी प्रयत्न करणे गरजेचे असून गावातील सत्कार हा मोठा पुरस्कार आसलेचे व्यक्त केले. यावेळी अध्यक्ष मारूती ईक्के यांनी
कार्य ततपर व्यक्तींचा यथोचित सन्मान करणे हे गावच्या हिताचे असल्याचे सांगितले यावेळी सरपंच शारदा गुरव, माझी सरपंच समिर पारदे, ग्रामसेवा मंडळ मुंबईचे अध्यक्ष राऊ बुगडे,शिवाजी करवळ सर , दत्तात्रय कुरळे, विष्णू जाधव, विश्वास बुगडे,पांडूरंग नेसरीकर, जगन्नाथ बुगडे, संजय बुगडे, शिवानंद आसबे यानी मनोगत व्यक्त केले. यावेळी संगिता बुगडे, बाबू निऊंगरे, उपसरपंच शोभा जाधव, शशिकला घोरपडे,चेतन नावलगी, संतोष कागिनकर , शिवाजी भगुत्रे, मनोहर कुरळे, केशव बुगडे, विजय कागिनकर , याच्या सह विविध संस्थाचे पदाधिकारी अंगणवाडी सार्वजनिक वाचनालय कार्यकर्ते व कागिणवाडी मलिग्रे ग्रामस्थ उपस्थित होते आभार संजय घाटगे यांनी मांडले .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.