मुमेवाडीत मनसे जनसंपर्क कार्यालयाचा. – उद्घाटन सोहळा संपन्न.- जि. प. पं. स. निवडणुका स्वयंपाळावर लढवणार
आजरा. – प्रतिनिधी.
आजरा मुमेवाडीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा रविवार दि. ४ रोजी मनसेचे जिल्हाचे नेते व माजी वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष पुंडलिकभाऊ जाधव यांच्या हस्ते संपन्न झाला. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले होते. यावेळी बोलताना श्री भाऊ जाधव म्हणाले समाजाला दिशा देण्याचे काम आजच्या तरुण पिढीने केले पाहिजे केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनेचा लाभ सर्वसामान्य जनतेला मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे, मनसेच्या या संपर्क कार्यालयातून बाहेर पडताना विभागातील जनतेच्या डोळ्यातून आनंद अश्रू निघावे अशा पद्धतीचे कार्य या कार्यातून व्हावे. ज्याने त्याला समाज समजतो असा नेता निवड येणाऱ्या काळात पंचायत समिती जिल्हा परिषद मध्ये मनसेचा लोकप्रतिनिधी जाण्यासाठी कामाला लागावे त्या कार्यकर्त्यांमध्ये कर्तृत्व नेतृत्व एक सांगड असली पाहिजे व अशा सामान्य माणसाला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देऊ नव्या युवकांना चैतन्य निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे विचार घरोघरी पोहचवावा व त्यांच्या नेतृत्वाखाली कामाला लागा असा संदेश श्री जाधव यांनी संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी दिला.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना जिल्हाध्यक्ष श्री चौगुले म्हणाले राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली राज्यात येणारी सत्ता येईल आजपासूनच शिवतीर्थी राज्यातील नेत्यांची लाईन लागली आहे असे नेतृत्व राज ठाकरे यांचा आहे मनसैनिकांनी अन्यायाविरुद्ध लढले पाहिजे अन्याय सहन करू नका जनतेची कामे करा जनतेच्या मदतीला धावून जा घरोघरी मनसेचे नाव घेतले पाहिजेत असं काम करा आम्ही आपल्या पाठीशी सदैव आहोत. असे श्री चौगुले म्हणाले यावेळी मनसेचे कामगार सेनेचे राजेंद्र निकम यांनी मनसैनिकांना मार्गदर्शन केले तालुका उपाध्यक्ष आनंदा घंटे यांनी नूतन संपर्क कार्यालय व विभागातील पदाधिकारी यांना शुभेच्छा व आलेल्या पाहुण्यांचे स्वागतपर मनोगत व्यक्त केले शाखेच्या वतीने पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाखाध्यक्ष उपाध्यक्ष सर्व पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मनसे ता. अध्यक्ष अनिल निऊगरे, जिल्हाउपाध्यक्ष सुधीर सुपल, महिला आघाडी जि. उपाध्यक्ष पुनम भादवणकर, ता. अध्यक्ष सरिता सावंत, ता. उपाध्यक्ष प्रकाश कांबळे, कमलेश यसादे, विभाग अध्यक्ष व मुमेवाडी विभागाचे युवा नेतृत्व सुनिल पाटील, शाखाध्यक्ष रोहित भिऊगडे, उपाध्यक्ष किरण भोसले, शाखा सचिव सुरेश पाटील तसेच तुकाराम कडाकणे चंद्रकांत इंगळे प्रकाश भिऊगुडे अक्षय येडुळकर व्यंकटेश भिऊगुडे, ओंकार भिऊगुडे, रोहिदास भिऊगुडे, पंकज पोटे, सागर करडे मच्छिंद्र भिऊगुडे, सचिन पोटे, अक्षय पोटे, वैभव चिकोडे, शैलेश सावेकर कपिल आजगेकर, सुरेश मगदूम, विकास कडाकणे, अनिकेत फराकटे सह आजरा तालुक्यातील सर्व पदाधिकारी मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन ता.सचिव चंद्रकांत सामरेकर यांनी केले. शाखाध्यक्ष यांनी मांनले.
