संवेदना फाउंडेशन आयोजित. – संवेदना संजीवनी मेडिकल इक्विपमेंट लायब्ररीतृतीय वर्धापनदिनानिमित्त. – रक्तदान शिबिर संपन्न. ( तालुक्यात मडिलगे प्रथम क्रमांकावर )
आजरा. – प्रतिनिधी.
संवेदना संजीवनी मेडिकल इक्विपमेंट लायब्ररीतृतीय वर्धापन दिन एका समाजोपयोगी उपक्रमाची यशस्वी तीन वर्षे मोठ्या संख्येने रक्तदान करुन संवेदना फाउंडेशने हा उपक्रम आजरा येथील पं दीनदयाळ येथे उत्साहात साजरा केला.
या उपक्रमात २०० रक्तदात्यांनी रक्तदान करण्याची नोंद केली होती या उपक्रमात २१३ रक्तदात्यांनी रक्तदान करून उत्कृष्ट सहभाग नोंदवला. रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ आहे. संवेदना संजीवनी महा रक्तदान शिबीराचे आयोजन पं. दिनदयाळ विद्यालय , आजरा येथे करण्यात आले होते. शिबीराचे उद्घाटन संवेदना महिला शक्ती टीमच्या सदस्या सौ.शुभांगी देसाई , सौ. मिलन केसरकर , सौ.अलका हरेर , सौ.कविता तिप्पे , सौ. सुरेखा खाडे , सौ. सोनम कातकर हस्ते करण्यात आले. आजरा, गडहिंग्लज तालुक्यातील २०० रक्तदात्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी आजरा तालुक्यात पहिल्याद्याच विक्रमी २१३ रक्तदात्यानी रक्तदान केले.
या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदाता ग्राम पुरस्कार यामध्ये ज्या गावचे सर्वात जास्त रक्तदाते होतील त्या गावाला सन्मानचिन्ह अध्यक्ष आण्णाप्पा पाटील, उपाध्यक्ष पांडुरंग पाटील यांच्या हस्ते देण्यात आले यामध्ये प्रथम क्रमांक मडिलगे गावचा तर व्दितीय आजरा व तृतीय हात्तिवडे गावचा अनुक्रमे क्रमांक आले. तसेच भविष्यात हा उपक्रम आणखी मोठा करण्याचा संकल्प डॉ प्रवीण निंबाळकर यांनी मांडला. या शिबिरासाठी संजीवन ब्लड सेंटर, कोल्हापूर यांचे सहकार्य लाभले.
सर्व रक्तदात्यांना संवेदना कॅप, झाडांची रोपे भेट देण्यात आले.
या कार्यक्रमात झोका इन्फोटेंन्मेंट कंपनीच्या झोका यू ट्यूब चॅनलचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये १० वीचा संपूर्ण अभ्यासक्रम मोफत पहायला मिळेल. संवेदना संजीवनी टीमचे प्रमुख डॉ.श्री निंबाळकर, सचिव संतराम केसरकर सर , डॉ. सुरजीत पांडव, डॉ. पल्लवी कांबळे, डॉ. बळीराम पाटील, वृक्षमित्र निलेश कांबळे, रोहन होन्याळकर, अमर पाटील, शरद पाटील, प्रशांत हरेर आदी मंडळी नी विशेष सहकार्य केले. सुरेश देशमुख यांनी सूत्रसंचलन केले. यावेळी संवेदना फाऊंडेशनचे व झोका इन्फोटेंन्मेंट चे सर्व सदस्य उपस्थित होते. आभार श्री पाटील यांनी मानले.

