मेव्हणे पाहुणे यांनी उचंगी मध्यम लघु पाटबंधारे पाणी पूजन करून श्रेय लाटू नये.- जिल्हाप्रमुख विजय देवणे
( आजरा येथे पत्रकार परिषदेत माहिती. )
आजरा. – प्रतिनिधी.
उचंगी मध्यम लघु पाटबंधारे प्रकल्पचा काल नुकताच पाणी पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या पार्श्वभूमीवर आजरा शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी श्री देवणे म्हणाले आमदार खासदार यांनी श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये आजरा तालुक्याला वरदायी ठरणारा उचंगी प्रकल्प गेली वीस वर्षे रखडला पुनर्वसन १००% व्हावे. ही शिवसेनेची भूमिका आहे व त्यासाठी शिवसेनेने लढे उभे केले मोर्चा आंदोलने केली मंत्रालयात राज्य सरकारच्या बैठका घेणे भाग पाडले यावेळी पुनर्वसन पाटबंधारे अर्थ खात्याची प्रधान सचिव यांनी उपस्थित ठेवले यावेळी दरमहा आजरा येथे पुनर्वसन बैठकाची मागणी व ती पूर्ण केली म्हणून तर पूर्ण वसनाचे प्रश्न मार्गी लावावे पाटबंधारे खाते ८०% धरणाचे काम पूर्ण झाल्यावर कळभणी करत नव्हती आजरा येथे भव्य मोर्चा व टप्प्याने आंदोलन करत अंतिम क्षणी पूजन करून प्रतिनिधीक घरभरणी केली लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना संघटित केले व शिवसेना या प्रश्नावर आग्रही राहिली शेवटी २०२२ साली घळभरणी झाली व उच्चं की प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला शिवसेनेने सध्या साध्या पद्धतीने उचंगीचे पाणी पूजन केले म्हणून चंदगडच्या आमदारांच्या व खासदारांच्या जीवाला लागले व त्यांनीही वाजत गाजत पूजन केले पण आमचा त्यांना प्रश्न आहे. उचंगी प्रकल्पावर पुनर्वसनासाठी घळभरणी झाली नाही. त्यावेळी आपण कोठे होता. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक लावली म्हणजे उचंगी प्रकल्प पूर्ण झाला असे नाही. त्यासाठी कष्ट सोसावे लागतात म्हणून आमदार खासदारनी उचंगी श्रेय लाटू नये आजऱ्याच्या शेतकऱ्यांना व प्रकल्पग्रस्ताचे डोळे उघडे आहेत. याचे त्यांनी भान ठेवावे असे श्री देवणे म्हणाले यावेळी ता. प्रमुख युवराज पोवार म्हणाले आमदार राजेश पाटील यांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये ते लॉटरीतील आमदार आहेत. फक्त हजेरी लावली म्हणजे काम झालं असं नाही शासकीय बैठकीला कधीही आले नाहीत तर शिंदे गटात गेलेले खासदार यांनी किमान पाणी पूजनासाठी तरी फिरावे ईश्वर त्यांना चांगली बुद्धी देओ यापूर्वी ते कधी आले नाहीत. पण अगोदर काम करून श्रेय घ्यावे. काही संबंध नसताना श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये. असे का प्रमुख श्री पवार म्हणाले या पत्रकार परिषद बैठकीला ता. प्रमुख राजेंद्र सावंत, शहर प्रमुख ओमकार माद्याळकर, विभाग प्रमुख दिनेश कांबळे सह पदाधिकारी उपस्थित होते