पाणी पूजनाचा नैतिक अधिकार प्रकल्पग्रस्तांनाचं. – आजरा श्रमिक मुक्ती दल.
आजरा – प्रतिनिधी.
प्रकल्पग्रस्तांच्या त्यागातूनच उचंगी धरणात पाणी तुंबले असून पाणी पूजनाचा नैतिक अधिकार प्रकल्पग्रस्तांनाचं आहे. पाणीपूजनासारखे कार्यक्रम घेण्यापूर्वी लोकप्रतिनिधींनी प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित सर्व प्रश्न सोडविण्यावर भर दिला असता तर तालुक्यातील सर्वच प्रकल्पग्रस्तांना दिलासा मिळाला असता. त्यामुळे केवळ पाणी पूजनासारखे कार्यक्रम घेऊन न थांबता, थबकलेली पुनर्वसन प्रक्रिया कशी वेगवान करता येईल यावर सर्वच लोकप्रतिनिधींनी भर द्यावा असे आवाहन श्रमिक मुक्ती दलाने केले आहे. आजरा तालुक्यात आंबेओहळ, उचंगी प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न शिल्लक असतांना आणि ते अजूनही सोडविले जातील याची खात्री नसतांना धरणात पाणी तुंबविले आहे. त्यामुळे ज्यांचे पुनर्वसन झालेले नाही असे प्रकल्पग्रस्त अस्वस्थ आहेत. त्यांना अश्वाशीत करणे ही आजच्या घडीची सगळ्यात मोठी बाब आहे ती शासन आणि प्रशासनाकडून होतांना दिसत नाही. त्यामुळे पाणी पूजनाला जितके महत्व दिले जात आहे किंबहुना त्याहून जास्त महत्व प्रलंबित प्रश्न सोडविण्यास द्यावे असे आम्हाला वाटते. असे पत्रक श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष कॉ संपत देसाई, प्रकाश मोरुस्कर, दशरथ घुरे, नारायण भडांगे, विष्णू मांजरेकर इत्यादींनी काढले आहे