पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा करण्याचे आजरा नगरपंचायतचे आहवान.
आजरा. – प्रतिनिधी.
आजरा नगरपंचायत हद्दीतील सर्व नागरिकांना नगरपंचायतच्या वतीने आहवान करण्यात आले आहे. की माझी वसुंधरा ३.० तसेच स्वच्छ सर्वेक्षण २०२३ अंतर्गत आजरा शहरातील नागरिकांना पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा करावा यासाठी खालील प्रमाणे अंमलबजावणी करावी अशी माहिती देण्यात आली आहे. यामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या ( पीओपी ) च्या मूर्ती ऐवजी शाडूची मूर्ती, माती किंवा, गोमय देशी गाईचे शेण ची मूर्ती तुरटी पासून बनवलेल्या मूर्ती किंवा इतर नैसर्गिक वस्तूचा वापर करून तयार केलेल्या मूर्तींचा वापर करावा सजावटीसाठी प्लास्टिक थर्माकोल यावर बंदी असल्याने त्याचा वापर टाळावा पर्यावरण पूरक सजावट करावी ध्वनी प्रदूषण टाळावे, नदी तलाव विहिरी यामध्ये गणेश मूर्तीचे विसर्जन करू नये, घरच्या घरी मोठी बादली मोठा डब यामध्ये घरगुती गणेश विसर्जन प्राधान्य द्यावे. नगरपंचायत मी नेमून दिलेल्या नवापूर घाट व वाडाचा गोट येथे तयार केलेल्या मूर्ती कृती पुन्हा मध्ये गणेश मूर्तीचे विसर्जन करावे तसेच स्मृतिदान करण्यात प्राधान्य द्यावे. निर्माल्य हे नगरपंचायतीचे केलेले निर्माल्य कलनाशकातच टाकावे तसेच नदीमध्ये विसर्जन करून जलप्रदूषण करु नये. नागरिकांना या सूचनेनुसार आजरा शहरांमध्ये प्रदूषण होणार नाही. असा गणेश उत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. व माझी वसुंधरा ३.० व स्वच्छ सर्वेक्षण २०२३ अभियानासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रदूषण मुक्त गणेश उत्सव साजरा करून सदर अभियानामध्ये सहभागी होऊन आजरा नगरपंचायतला सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी, नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक यांच्या वतीने करण्यात आले आहे.
[ आजरा नगरपंचायत माजी वसुंधरा अभियान अंतर्गत फटाके बाबत. – भारत सरकार अधिसूचना क्रमांक G.S.R.६८२ (E) dt. ५.१०.१९९ १२५ DB (A१) पेक्षा जास्त आवाज करणाऱ्या फटाक्यांची निर्मिती विक्री किंवा वापर करण्यास मनाई आहे. अशा फटाक्यांचे उत्पादन विक्री किंवा वापर बेकायदेशीर आहे. तसेच आपणास सर्वांना माहितीच आहे. की आपण वातावरणीय बदला सामोरे जात आहोत. वातावरणाच्या बदलाच्या अनेक कारणांपैकी हवेचे प्रदूषण हे एक महत्त्वाचे कारण आहे विविध सण उत्सव प्रसंगी आपण वाजवत असलेल्या फटाके मध्ये कार्बन व सल्फर चे प्रमाण अधिक असते ते विषारी वायूच्या शरी तयार करतात ते वायू वनस्पती पक्षी आणि प्राणी तसेच मानवी प्रजातीस हानी पोहोचवतात हवेचे प्रदूषण थांबवण्याची क्रिया आपण स्वतःपासून सुरू करू शकतो सबब माझी वसुंधरा अभियान अंतर्गत येणाऱ्या सण उत्सवात फटाके वाजवण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. तरी सर्व नागरिकांनी त्याची अंमलबजावणी करावी असे आवाहन करण्यात येत आहे येणारा गणेशोत्सव हरित व पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा करूया तसेच श्री गणेश उत्सव आनंदी व सुरक्षित जावो अशी सर्वांना शुभेच्छा..]