उचंगी ‘ चा प्रकल्पातील जलसाठ्याचा पाणीपूजन समारंभ संपन्न. –
( माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, हसनसो मुश्रीफ यांच्यासह मान्यवर उपस्थित झाला जलसाठ्याचा पाणीपूजन समारंभ. )
आजरा. – प्रतिनिधी.
आजरा येथील उचंगी प्रकल्पातील जलसाठ्याचा पाणी पूजनाचा समारंभ शुक्रवार दि. २ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, हसनसो मुश्रीफ यांच्यासह मान्यवर उपस्थित झाला जलसाठ्याचा पुजन कार्यक्रमास मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वीस वर्षापासून तारहोळ खोऱ्यातील शेतकऱ्यांनी पाहिलेले उत्संगी प्रकल्प पूर्तीचे स्वप्न अखेर साकार झाले कै. माजी खासदार सदाशिवराव मंडलिक, कै बाबासाहेब कुपेकर माजी विधानसभा अध्यक्ष, कै. नरसिंहराव पाटील माजी आमदार यांच्या प्रयत्नातून सुरुवात झालेला हा प्रकल्प अखेर पूर्ण होऊन उचंगी प्रकल्पातील जलसाठ्याचा पाणीपूजन समारंभ आज प्रत्यक्षात संपन्न झाला.
या पाणी पूजन समारंभास खासदार संजय मंडलिक आमदार राजेश पाटील राष्ट्रवादी कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष ए. वाय. पाटील, रामाप्पा कारिगार, मुकुंदराव देसाई, जयवंतराव शिंपी, अल्बर्ट डिसोझा सुधीर देसाई, भिकू गावडे, बाबासाहेब पाटील, एम. के. देसाई, रचना होलम, दिगंबर जाधव, सह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी प्रकल्पग्रस्त, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
