मौजे भादवण. ता. आजरा तलाठी कार्यालय भूमिपूजन सोहळा संपन्न.
आजरा – प्रतिनिधी.

कागल विधानसभा मतदारसंघातील मौजे भादवण ता. आजरा येथे नियोजित तलाठी कार्यालयाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आजरा – राधानगरी – भुदरगडचे आमदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते संपन्न झाला पंचक्रोशीतील भादवण, भादवणवाडी, खोराटवाडी, जाधवाडी येथील सरपंच उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार श्री आबिटकर म्हणाले भादवण गावच्या विकासासाठी लागेल तेवढा निधी देण्याची ग्वाही दिली. नियोजित तलाठी कार्यालयाचे काम चांगल्या पद्धतीने झाले पाहिजेत सरपंच संजय पाटील विकास कामे धडपडून करतात त्यांच्या पाठपुरामुळे सदर तलाठी कार्याची काम मंजूर झाले असल्याचे यावेळी बोलताना आमदार श्री आबिटकर यांनी सांगितले यावेळी प्रा. रणजीत गाडे, टी. बी. मुळीक यांनी मनोगत व्यक्त केले सरपंच संजय पाटील यांनी आमदार प्रकाश आबिटकर यांच्या माध्यमातून मौजे भादवण गावात कोट्यावधीची कामे झाली आहेत. याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार मानले.
यावेळी मंडळ अधिकारी प्रवीण खरात, सोसायटीचे चेअरमन पी. के. केसरकर, उपसरपंच हरिबा कुंभार, ग्रामविकास अधिकारी राजन दड्डीकर तलाठी रमेश यादव सर्व ग्रामपंचायत सदस्य ज्येष्ठ नागरिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार दयानंद पाटील यांनी केले.

