Homeकोंकण - ठाणेफडणवीसांच्या नागपुरात माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरेंचे दणक्यात स्वागत.

फडणवीसांच्या नागपुरात माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरेंचे दणक्यात स्वागत.

फडणवीसांच्या नागपुरात माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरेंचे दणक्यात स्वागत.

नागपुर:-प्रतिनिधी.

सत्ता बदलानंतर प्रथमच नागपुरात आलेले शिवसेनेच्या युवासेनेचे प्रमुख व माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे शनिवारी नागपूर विमानतळावर शिवसैनिकांनी दणक्यात स्वागत केले.शेकडो शिवसैनिक त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर उपस्थित होते. ठाकरे विमानतळाबाहेर येताच शिवसैनिकांनी जय शिवाजी जय भवानी, आदित्य ठाकरे जिंदाबादच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला. शिवसैनिकांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. विशेष म्हणजे यावेळी महिला शिवसैनिकांची संख्या लक्षणीय होती. त्यांच्या हाती ‘ आय लव्ह आदित्य ठाकरे’ असे लिहिलेले फलक होते.
शिवसेनेत फूट पडल्यावर जिल्ह्यातील पक्षाचे एकमेव खासदार, एक आमदार आणि काही पदाधिकारी शिंदे गटांसोबत गेले. मात्र शिवसैनिक पक्षासोबत असल्याचे ठाकरे यांच्या स्वागतासाठी झालेल्या गर्दीवरून स्पष्ट झाले. वीज केंद्रातील राखेमुळे बाधित नांदगावच्या शेतक-यांना भेटण्यासाठी ठाकरे शनिवारी नागपुरात आले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.